घरदेश-विदेशS. Jaishankar on Arunachal : तुमच्या घराचे नाव मी बदलले तर ते...

S. Jaishankar on Arunachal : तुमच्या घराचे नाव मी बदलले तर ते माझे होईल का; परराष्ट्र मंत्र्यांनी चीनला सुनावले

Subscribe

नवी दिल्ली : भारताचा शेजारी म्हणवणाऱ्या चीनने अनेकदा अरुणाचल प्रदेशवर आपला दावा सांगितला आहे. यावरुन भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमकी देखील झाल्या आहेत. दरम्यान, चीनने अरुणाचलमधील 30 ठिकाणांना नावं देत पुन्हा एकदा आगळीक केली आहे. वारंवार बजावूनही चीनची आगळीक सुरूच असल्याने आता केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चीनला कडक शब्दात सुनावले आहे.

सोमवारी चीनने भारतातील विविध ठिकाणांच्या 30 नवीन नावांची चौथी यादी जाहीर केली. त्यानंतर परराष्ट्र मंत्र्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांनी परराष्ट्र मंत्र्यांना याबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी चीनला चांगलाच आरसा दाखवला. यासंदर्भात जयशंकर म्हणतात, “मी जर तुमच्या घराचे नाव बदलले, तर ते माझे होणार आहे का? अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे अशा पद्धतीने भागांची नावे बदलून काहीही होणार नाही. भारताचे सैन्य सीमेवर तैनात आहे. ते त्यांचे काम योग्यरित्या करतील.” अशाप्रकारे बाहेरच्या कोणीही नाव बदलल्याने काहीही फरक पडत नाही. जे आमचे आहे, ते आमचेच राहणार, असेही एस. जयशंकर यांनी सुनावले आहे. अरुणाचल प्रदेश आमचाच भूभाग असल्याचा दावा चीनने पुन्हा एकदा केला आहे. असा दावा करण्याची चीनची या महिन्यातील चौथी वेळ आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Thackeray group : स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घ्यायची, ठाकरे गटाच्या रडारवर मोदी सरकार

- Advertisement -

चीन अरुणाचल प्रदेशला म्हणतो ‘जंगनान’

चीनी सरकारी मीडिया ‘ग्लोबल टाईम्स’ नुसार, चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने ‘जंगनान’मधील भौगोलिक नावांची चौथी यादी जाहीर केली. चीन अरुणाचल प्रदेशला ‘जंगनान’ म्हणतो आणि राज्यावर दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा करतो. मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर प्रदेशासाठी 30 नावे देखील पोस्ट करण्यात आली आहेत. ही यादी 1 मे पासून लागू होणार आहे. तिथल्या मंत्रालयाने यापूर्वी 2017 मध्ये “जंगनान” मधील सहा ठिकाणांच्या नावाची पहिली यादी जाहीर केली, तर 2021 मध्ये 15 ठिकाणांची दुसरी यादी जाहीर केली होती. त्यानंतर 2023 मध्येही 11 ठिकाणांच्या नावांसह तिसरी यादी जाहीर करण्यात आली होती.

अरुणाचल प्रदेशवर अमेरिकेची प्रतिक्रिया

अरुणाचल प्रदेश भारताचा भाग असल्याचे म्हणत अमेरिकेने यापूर्वीच चीनवर टीका केली होती. तसेच, एलएसीवर सीमा वाढविण्याच्या दिशेने उचललेल्या चीनच्या पावलांचा निषेधही केला होता.

हेही वाचा – Bihar Unique Marriage: चहा प्यायला गेला अन् लग्न करून आला; चर्चा बिहारमधल्या लग्नाची

चीनचा दावा हास्यास्पद

भारताचा अविभाज्य भाग असलेल्या अरुणाचल प्रदेशवर चीनने सोमवारी पुन्हा एकदा दावा केला आहे. अरुणाचल प्रदेश हा आमचाच भूभाग असल्याचं चीनने म्हटलं आहे. यापूर्वीही बीजिंगकडून झालेला हा दावा ‘बिनबुडाचा’ आणि ‘हास्यास्पद’ असल्याचं सांगत भारताने तो फेटाळून लावला आहे.

बेकायदेशीररित्या ताबा मिळवलेला भाग

लिन यांनी केलेल्या दाव्यानुसार जंगनान (अरुणाचल प्रदेशला चीनने दिलेलं नाव) हा भारताने ‘बेकायदेशीररित्या ताबा’ मिळवलेला भाग असून पूर्वी तो चीनचाच भाग होता. चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने अरुणाचल प्रदेशवर कायमच चीनचा प्रभाव असल्याचा दावाही केला आहे. तर, भारताने 1987 मध्ये बेकायदेशीररित्या ताबा मिळवलेल्या भागाला ‘कथित अरुणालच प्रदेश’चे नाव दिले, असे चीनचे म्हणणे आहे. चीनची ही भूमिका कधीही बदललेली नाही’, असे लिन यांनी प्रतिक्रिया नोंदवताना म्हटलं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -