घरदेश-विदेशमी तुम्हाला हात लावला तर...; संसदेबाहेर राहुल गांधी खर्गेंना असं का म्हणाले?

मी तुम्हाला हात लावला तर…; संसदेबाहेर राहुल गांधी खर्गेंना असं का म्हणाले?

Subscribe

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी सहसा विनोदी आणि सौम्य स्वभावासाठी ओळखले जातात. मात्र, शुक्रवारी संसदेतून बाहेर पडताना त्यांनी समोर उभ्या असलेल्या मीडियावर आपला राग जाहिर केला. व्हायरल व्हिडिओचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासमोर भाजपच्या सोशल मीडिया शाखेवर निशाणा साधला. राहुल गांधी म्हणाले की, मी तुम्हाला हात लावला तर ते म्हणतील मी तुमचे नाक पुसत आहे.

संसदेतून बाहेर पडताना राहुल गांधींसोबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि सोनिया गांधी होत्या. संसदेच्या दरवाजातून बाहेर पडताना राहुल खर्गेंना म्हणाले की, “मी तुम्हाला हात लावला तर हे लोक म्हणतील की मी तुमचे नाक पुसतो आहे. तुम्ही तो व्हिडीओ पाहिला असेल, मी तुम्हाला मदत करत असताना हे लोक म्हणत आहेत मी माझे नाक पुसून हात तुमच्यावर पुसत आहे.”

- Advertisement -

कोणत्या व्हिडिओबद्दल राहुल गांधी बोलत आहेत?
नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये राहुल गांधी मल्लिकार्जुन खर्गेसोबत संसदेच्या दिशेने जात असताना ते खर्गेंच्या खांद्यावर हात ठेवून चालत आहेत. या दोघांचा व्हिडीओ काही सोशल शाखांनी हा व्हिडीओ शेअर करत असे म्हटले की, राहुल गांधी यांनी आपला हात नाकातून बाहेर काढल्यानंतर त्यांनी तो मल्लिकार्जुन खर्गेच्या पाठीवर ठेवून हात पुसत होते. काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी असेही म्हटले की, राहुल गांधी इतर काँग्रेस नेत्यांना टिश्यू पेपर समजतात.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -