Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश नोकरी गमावली आहे? घाबरू नका! ESIC च्या 'या' योजनेद्वारे मिळणार बेरोजगारी भत्ता;...

नोकरी गमावली आहे? घाबरू नका! ESIC च्या ‘या’ योजनेद्वारे मिळणार बेरोजगारी भत्ता; वाचा सविस्तर

Related Story

- Advertisement -

कोरोना प्रादुर्भावादरम्यान बर्‍याच लोकांनी आपल्या नोकर्‍या गमावल्या आहेत. CMIE च्या मते, २१ जूनपर्यंत भारतात बेरोजगारीचे सरासरी प्रमाण १०.६ टक्के आहे. २१ जून रोजी बेरोजगारी १२.९९ टक्के झाली होती. मात्र, गेल्या दोन आठवड्यांत ही बेरोजगारीचा दर थोडा खाली आला आहे. गेल्या वर्षी तर देशव्यापी लॉकडाऊनमध्ये बेरोजगारी २४ टक्क्यांच्या पुढे गेली होती. अशा परिस्थितीत तुम्हीही बेरोजगार झाला असाल तर घाबरून जाण्याची गरज नाही. ESIC (RGSKY Benefits) योजनेंतर्गत तुम्हाला बेरोजगारी भत्ता मिळू शकणार आहे.

RGSKY म्हणजे नेमकं काय?

बेरोजगारी भत्ता देणारी राजीव गांधी श्रमिक कल्याण योजना (Rajiv Gandhi Shramik Kalyan Yojana– RGSKY) आहे. ही योजना २००५ पासून चालविली जात आहे. यामध्ये जर एखादी व्यक्ती ‘व्यक्ती कर्मचारी राज्य विमा योजने’ अंतर्गत येत असेल तर तो व्यक्ती बेरोजगार झाल्यावर त्याला आर्थिक मदत दिली जाते. याअंतर्गत, व्यक्तीच्या उत्पन्नापैकी ५० टक्के रक्कम बेरोजगारी भत्ता म्हणून आर्थिक सहाय्य स्वरूपात दिली जाते. मात्र ही मदत जास्तीत जास्त २ वर्षांसाठी दिली जाते.

या योजनेच्या जाणून घ्या अटी

- Advertisement -

या योजनेंतर्गत मिळणाऱ्या बेरोजगारी भत्त्यासह काही अटी आहेत. जर ती व्यक्ती त्या अटींमध्ये येत असेल तरच हा भत्ता त्या व्यक्तीला देण्यात येतो. कोणत्या आहेत त्या अटी जाणून घ्या.

राजीव गांधी श्रमिक कल्याण योजनेचा लाभ केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयामार्फत राबविल्या जाणार्‍या ESIC योजनेंतर्गत देण्यात येतो ही योजना आधीच ESIC योजने अंतर्गत येणाऱ्या व्यक्तींसाठी आहे. या योजनेची माहिती तिच्या ट्विटर हँडलवर शेअर करताना ESIC ने सांगितले की, कोणत्या परिस्थितीत या योजनेचा (बेरोजगारी भत्ता) लाभ बेरोजगार व्यक्तीला मिळू शकेल.

- Advertisement -

आयडी कायद्यांतर्गत, जर ईएसआयसी विमाधारकास रीट्रेंचमेंट किंवा फॅक्टरी बंद झाल्यामुळे नोकरी गमावली तर तो बेरोजगारी भत्त्यास पात्र ठरतो. विमाधारकास बेकारी भत्त्यासाठी शाखा कार्यालयात अर्ज करावा लागतो. शाखा कार्यालय या अर्जाच्या दाव्याची तपासणी करते आणि SRO किंवा RO कडे अर्ज पाठवते. यानंतरच त्या व्यक्तीला भत्ता मिळू शकतो.


महत्त्वाची बातमी! जुलैमध्ये किती दिवस बँका असणार बंद! पहा RBI ची ऑफिशियल Holiday List

- Advertisement -