राम मंदिराला विरोध केल्यास सरकार पाडू – स्वामी

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि उत्तरप्रदेशातील सरकार योगी सरकारनं राम मंदिराला विरोध केल्यास दोन्ही सरकार पाडण्याचा इशारा सुब्रम्हण्यम स्वामी यांनी दिला आहे.

Subramanian Swamy
फोटो सौजन्य - New Indian Express

राम मंदिराच्या मुद्यावरून आता सुब्रम्हण्यम स्वामी यांनी सरकराल थेट इशारा दिला आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि उत्तरप्रदेशातील सरकार योगी सरकारनं राम मंदिराला विरोध केल्यास दोन्ही सरकार पाडण्याचा इशारा सुब्रम्हण्यम स्वामी यांनी दिला आहे. त्यामुळे भाजप समोरच्या अडचणी वाढल्या आहे. सुब्रम्हण्यम स्वामी हे भाजपचे राज्यसभेतील खासदार आहेत. जवाहरलाल नेहरू विद्यापीठामधील एका कार्यक्रमादरम्यान बोलत असताना त्यांनी थेट सरकारला इशारा दिला आहे. राम मंदिराची सुनावणी सध्या न्यायप्रविष्ठ आहे. त्यावर आता जानेवारीमध्ये सुनावणी होणार आहे.

आणखी काय म्हणाले सुब्रम्हण्यम स्वामी ?

राम मंदिरावर जानेवारीमध्ये सुनावणी होणार आहे. आम्ही दोन आठवड्यात जिंकू. न्यायालयामध्ये केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार आमचे विरोधक आहेत. मला विरोध करण्याची त्यांच्यामध्ये हिंमत आहे? मला त्यांनी विरोध केल्यास मी सरकार पाडेन. पण, मला ते विरोध करणार नाहीत हे मला माहित आहे. अशा शब्दात सुब्रम्हण्यम स्वामी यांनी सरकारला इशारा देत घरचा आहेर दिला आहे.

तसेच राम मंदिरासाठी मुस्लिमांचा विरोध नाही असा दावा देखीव यावेळी स्वामी यांनी केला. काही मुस्लिमांना मी प्रत्यक्ष भेटलो पण त्यांचा राम मंदिराच्या उभारणीस विरोध नाही असं त्यांनी मला सांगितलं. बाबरने ताब्यात घेतलेला हा भूखंड आमचा आहे, असं सुन्नी वक्फ बोर्डाचं म्हणणं आहे. पण, त्या जागेवर पुन्हा मशीद उभारायची आहे, असं त्यांनी कुठेही म्हटलं नाही, असं देखील स्वामी यांनी यावेळी म्हटलं आहे. दरम्यान, शिवसेना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विहिंप आणि आता थेट स्वामी यांनी राम मंदिराच्या मुद्यावरून सरकारला लक्ष्य केलं आहे.

वाचा – राम मंदिरावरुन देशात दंगली घडवण्याचे कारस्थान – राज ठाकरे