Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश 'पाहुणे चांगले असतील तर यजमानही...'; एस जयशंकर यांचा बिलावल भुत्तोंवर हल्ला

‘पाहुणे चांगले असतील तर यजमानही…’; एस जयशंकर यांचा बिलावल भुत्तोंवर हल्ला

Subscribe

नवी दिल्ली : शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या परराष्ट्र मंत्र्यांची दोन दिवसीय बैठकीमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलाबल भुत्तो झरदारी (Bilawal Bhutto Zardari) आमनेसामने आले होते. यावेळी जयशंकर यांनी हस्तांदोलन न करता केवळ नसस्ते करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावरून चर्चेचा विषय ठरत असताना जयशंकर यांनी झरदारी यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, पाहुणे चांगले असतील तर यजमानही चांगले असतात.

अलीकडेच 4 आणि 5 मे रोजी गोव्यात झालेल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीबद्दल बोलताना एस जयशंकर म्हणाले की, यावेळी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांना SCO च्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते, मात्र बिलावल भुत्तो यांनी SCO च्या बैठकीबद्दल न बोलता पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या म्हैसूरमधील परराष्ट्र धोरणाशी संबंधित कार्यक्रमाबद्दल सांगितले आहे. त्यांची वक्तव्य पाहिले तर भुत्तो यांनी जी-20, काश्मीर आणि बीबीसी डॉक्युमेंटरीचा समावेश आहे. ते म्हणाले की, ‘मी यजमान म्हणून काय केले असते. माझे पाहुणे चांगले असतील तर मी यजमान चांगेल असतात.

- Advertisement -

…म्हणून पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांना निमंत्रित केले
एस जयशंकर यांनी बिलाबल भुत्तो यांना भारतात निमंत्रित करण्यामागील कारणही स्पष्ट केले. ते म्हणाले की, SCO च्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक भारतात असल्यामुळे आम्ही पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांना निमंत्रित केले होते. जेव्हा बहुपक्षीय बैठकांचा प्रश्न येतो तेव्हा लोकांना त्या चर्चेसाठी आमंत्रित करावे लागते. पाकिस्तानचे प्रतिनिधी म्हणून पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांना SCO च्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी त्यांच्या क्षमतेनुसार आमंत्रित करण्यात आले होते.

बैठकीनंतर एकमेकांवर हल्ला करणे सुरू
गोव्यात एससीओच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान एस जयशंकर आणि बिलावल भुत्तो एकमेकांवर शाब्दिक हल्ले करत आहेत. जयशंकर यांनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तानवर निशाणा साधताना म्हटले की, दहशतवादाकडे दुर्लक्ष करणे या समूहाच्या सुरक्षेसाठी हानिकारक ठरले आहे. जेव्हा जग कोरोना महामारी आणि त्याचे परिणामांशी लढा देत होता, त्यावेळी दहशतवाद तसाच राहिला आहे. त्याचवेळी बिलावल यांनी अप्रत्यक्षपणे भारतावर निशाणा साधला आहे. दहशतवादाला राजनैतिक फायद्यासाठी शस्त्र बनवण्याचा प्रयत्न करू नये, असे त्यांनी म्हटले.

- Advertisement -

पाकिस्तान हा दहशतवादाचा उद्योग
बैठकीनंतर जयशंकर यांनी पाकिस्तानला दहशतवादाचा उद्योग आणि बिलावल भुत्तो यांचे प्रवर्तक, न्यायकर्ता आणि प्रवक्ते म्हणून वर्णन केले आहे. SCOच्या बैठकीत दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तान आणि बिलावल यांच्यावर टीका झाल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे, पाकिस्तानामध्ये परतल्यावर बिलावल यांनी पुन्हा एकदा काश्‍मीरबाबत गदारोळ करत भाजपा-आरएसएसवर निशाणा साधला आहे.

- Advertisment -