घरCORONA UPDATECorona: ...तर देशात कोरोनाबाधितांची संख्या दोन लाख असती - आरोग्य मंत्रालय

Corona: …तर देशात कोरोनाबाधितांची संख्या दोन लाख असती – आरोग्य मंत्रालय

Subscribe

देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ७ हजार ८९४ वर पोहोचली असून गेल्या २४ तासांत १ हजार ०३५ नवीन रुग्ण आढळून आल्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली.

देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ७ हजार ८९४ वर पोहोचली असून गेल्या २४ तासांत १ हजार ०३५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर ४० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत एकूण २३९ जणांचा देशात कोरोनाने मृत्यू झाला असून कोरोनाच्या ६४२ रुग्णांवर उपचार करून ते बरे झाले आहेत, याबाबतची माहिती आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, देशात असलेल्या लॉकडाऊनबाबत त्यांनी सांगितले की, जर हा लॉकडाऊन, कोरोनाबाधितांचे विलगीकरण आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम नसते तर देशात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या २ लाखांवर गेली असती.

- Advertisement -

देशात फक्त कोरोनासाठी ५८६ हॉस्पिटल बनवण्यात आले आहेत. या हॉस्पिटलमध्ये एक लाख बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच डॉक्टर, हॉस्पिटल स्टाफ आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण पुरवण्याचे आदेश राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना देण्यात आले आहेत. क्वारंटाइन असलेल्या रुग्णांसाठी सेवा देणाऱ्या वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांनाही सुरक्षा देण्यात यावी, असेही आदेश राज्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संयुक्त सचिवांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -