Coronavirus:…जर लॉकडाउन नसते तर जगात ४ करोड लोकांचा मृत्यू झाला असता

कोरोनाची लस आठ महिन्यांच्या आत येऊ शकते, असा दावा इम्यूनोलॉजिस्ट आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे प्रा. मार्टिन बाचमन यांनी केला आहे.

WORLD LOCKDOWN

जगभरात कोरोनाचा कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी बर्‍याच देशांमध्ये लॉकडाऊन आहे. भारतातही सरकारने १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. लॉकडाऊन योग्य असल्याचे बर्‍याच लोकांचे मत आहे, परंतु लॉकडाऊनचे विरोधकही कमी नाहीत. चीनच्या हुबेई प्रांतात सुरू झालेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग जगातील सर्व देशांपर्यंत पोहोचला आहे. परंतु लॉकडाऊनच्या विरोधकांचा असा युक्तिवाद आहे की यामुळे जागतिक अर्थव्यवस्था दुर्बल होईल आणि लोक बेरोजगार होतील. परंतु एका नवीन संशोधनात असे म्हटले आले आहे की जर जगातील बहुतांश लोकसंख्या लॉकडाऊनखाली नसती तर कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत ४ करोडपेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडले असते आणि कित्येक अब्ज लोक संक्रमित झाले असते.

३.८ करोड लोक वाचणार

लंडनच्या इम्पीरियल कॉलेजच्या संशोधकांनी कोरोनाच्या संभाव्य नुकसानीचे मूल्यांकन केले आहे. ते म्हणाले आहेत की व्हायरसच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी केलेल्या उपायांमुळे मृत्यूंची संख्या ५० ते ९५ टक्क्यांनी कमी होऊ शकते. ते म्हणाले की लॉकडाउन, सामाजिक अंतर आणि वृद्धांना सुरक्षित ठेवण्यासारख्या उपाययोजनांमुळे जवळपास ३८ दशलक्ष लोकांचे प्राण वाचू शकतात.


हेही वाचा – Coronavirus: क्वारंटाईन आणि आयसोलेशनमध्ये फरक काय आहे?

कोरोनाची लस आठ महिन्यांच्या आत येऊ शकते

कोरोनाची लस लवकरच उपलब्ध होईल. इम्यूनोलॉजिस्ट आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे प्रा. मार्टिन बाचमन यांनी असा दावा केला आहे की येत्या ६ ते ८ महिन्यांत जगात पुरेशा लस उपलब्ध होतील. कोरोना विषाणूचा प्रसार सेलमध्ये असलेल्या स्पाइक प्रोटीन रिसेप्टरशी होतो, ज्यामुळे संसर्ग पसरतो. या रिसेप्टरला एसीई -2 असे म्हणतात. आम्ही स्पाइक प्रोटीनच्या भागासह लस तयार करण्याच्या दिशेने कार्य करीत आहोत, ज्याला रिसेप्टर-बाइंडिंग डोमेन (आरबीडी) म्हणतात.