घरदेश-विदेशखरे योगी असल्याचा पुरावा द्या; ओवैसींचं योगी आदित्यनाथांना आव्हान

खरे योगी असल्याचा पुरावा द्या; ओवैसींचं योगी आदित्यनाथांना आव्हान

Subscribe

बिहार विधानसभा निवडणुकीत रंगत चढू लागली असून राजकीय पक्ष प्रचारसभा घेऊन एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. यामध्ये अनेक मोठे नेते एकमेकांसोर आले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी जमुई विधानसभा मतदार संघातील प्रचारसभेत एमआयएम (AIMIM) पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्यावर टीकास्त्र सोडलं. यावर आता ओवैसी यांनी योगींना प्रत्युत्तर दिलं आहे.

योगी आदित्यनाथ यांनी असदुद्दीन ओवैसी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधताना हे दोन्ही नेते पाकिस्तानचं कौतुक करत आहेत, असं म्हटलं. यावर ओवैसी यांनी बुधवारी प्रत्युत्तर देताना, “मी योगी आदित्यनाथ यांना आव्हान देतो की त्यांनी २४ तासात खरे ययोगी असल्याचा पुरावा द्यावा. त्यांच्या बोलण्यावरुन त्यांची निराशा दिसून येते. त्यांना माहिती नाही आहे की मी पाकिस्तानात गेलो आणि मी भारतीय लोकशाहीबद्दल बोललो?” असा घणाघात केला आहे.

- Advertisement -

योगी आदित्यनाथ यांनी जमुई विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार श्रेयसी सिंह यांच्या प्रचारसभेत भाषण करताना राहुल गांधी आणि ओवैसी यांच्यावर निशाणा साधला. “राहुल गांधी आणि ओवैसी पाकिस्तानचे कौतुक करत आहेत. तुम्ही या दोघांकडून देशाच्या हिताबद्दल बोलतील असं वाटतंय का? ते देशाचे हित करतील का? जे देशामध्ये दहशतवाद पसरवत आहे, जे शत्रूच्या हिताबद्दल बोतल आहेत, त्यांच्याकडून देशाच्या हिताबद्दल काय अपेक्षा करणार? अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी केली होती.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -