घर देश-विदेश 'तुम्ही परत याल तर पंतप्रधान बनूनच या'; राहुल गांधींना 'कोणत्या' गावातील लोकांनी...

‘तुम्ही परत याल तर पंतप्रधान बनूनच या’; राहुल गांधींना ‘कोणत्या’ गावातील लोकांनी म्हटले असे,वाचा-

Subscribe

संसदेचे सदस्यत्व बहाल झाल्यानंतर कॉंग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी आज त्यांचा लोकसभा मतदार संघ असलेल्या वायनाडला भेट दिली.

तिरुअनंतपुरम : लोकसभेचे सदस्यत्व बहाल झाल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul gandhi) प्रथमच त्यांचा लोकसभा मतदारसंघ वायनाड (केरळ) येथे पोहोचले. शनिवारी वायनाडमध्ये एका जाहीर सभेलाही त्यांनी संबोधित केले. तत्पूर्वी, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी उटीजवळील मुथुनडू गावात टोडा आदिवासी समुदायाची भेट घेतली. टोडा महिलांनी राहुल गांधींना तुम्ही परत याल तर पंतप्रधान म्हणून या ठिकाणी परत या असे म्हटले. यासोबतच त्यांनी सामुदायिक देवतेच्या मंदिराला भेट देऊन तेथील पारंपारिक पद्धतींचे निरीक्षण केले.(‘If you come back, come as Prime Minister’; Rahul Gandhi was called ‘which’ village by the people, read-)

संसदेचे सदस्यत्व बहाल झाल्यानंतर कॉंग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी आज त्यांचा लोकसभा मतदार संघ असलेल्या वायनाडला भेट दिली. यावेळी त्यांनी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, मणिपूरमध्ये हजारो लोकांना त्रास सहन करावा लागला आहे. कुणाचे घर जाळले गेले, कुणाच्या बहिणीवर बलात्कार झाला, तर कुणाचा भाऊ आणि आई-वडील मारले गेले. जणू काही मणिपूरभर कोणीतरी रॉकेल टाकून पेटवून दिले आहे. पुढे राहुल गांधी म्हणाले की, मी काही वेळापूर्वी मणिपूरला गेलो होतो. मी 19 वर्षांपासून राजकारणात आहे आणि मी मणिपूरमध्ये जे अनुभवले तसे मी कधीही अनुभवले नसल्याचेही ते यावेळी म्हणाले. केरळ काँग्रेसचे कार्याध्यक्ष व्हीटी सिद्दीकी यांनी सांगितले की, राहुल गांधी यांचे वायनाड येथे आगमन होताच त्यांचे हार्दिक स्वागत करण्याची तयारी करण्यात आली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला लोकसभा सचिवालयातून अधिसूचना जारी केल्यानंतर राहुल गांधी यांची संसद पूर्ववत झाली आहे. केरळ काँग्रेसचे कार्याध्यक्ष व्ही.टी. सिद्दीकी यांनी सांगितले की, राहुल गांधी यांचे वायनाड येथे आगमन झाल्यानंतर त्यांचे मोठ्या हर्षोउल्हासात स्वागत करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Mumbai-Goa Highway : निवळी घाटात टॅंकर उलटल्याने वाहतूक ठप्प; मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेचेही तेच हाल

सर्वोच्च न्यायालयाने दिली होती शिक्षेला स्थगिती

- Advertisement -

मोदी आडनाव प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. त्यानंतर राहुल गांधींच्या संसदेच्या पुनर्स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. केसी वेणुगोपाल यांनी ट्विट केले की, राहुल गांधी 12-13 ऑगस्ट रोजी त्यांच्या लोकसभा मतदारसंघ वायनाडला भेट देणार आहेत. वायनाडच्या लोकांना आनंद आहे की, लोकशाहीचा विजय झाला आणि त्यांचा आवाज पुन्हा संसदेत आला. राहुल गांधी हे केवळ त्यांचे खासदार नसून कुटुंबातील सदस्यासारखे आहेत.

हेही वाचा : आजपासून दिल्ली केंद्राच्या ताब्यात, डेटा संरक्षण विधेयकाचेही कायद्यात रुपांतर; राष्ट्रपतींची मिळाली मंजूरी

पारंपारिक नृत्यात झाले सहभागी

काँग्रेस खासदार राहुल गांधी तामिळनाडूमधील उटीजवळील मुथुनडू गावात तोडा आदिवासी समुदायाच्या सदस्यांसह पारंपारिक नृत्यात सहभागी झाले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी शनिवारी दोन दिवसांच्या दौऱ्यावर त्यांचा लोकसभा मतदारसंघ वायनाड येथे पोहोचणार आहेत. लोकसभेचे सदस्यत्व बहाल केल्यानंतर त्यांचा हा पहिलाच वायनाड दौरा आहे. या दौऱ्याबाबत काँग्रेसच्या केरळ युनिटमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

- Advertisment -