घरट्रेंडिंगआता PAN Card हरवलं तर नो टेन्शन! केवळ ५ मिनिटांत मिळणार नवं...

आता PAN Card हरवलं तर नो टेन्शन! केवळ ५ मिनिटांत मिळणार नवं पॅनकार्ड; जाणून घ्या प्रक्रिया

Subscribe

Income Tax Department अर्थात प्राप्तिकर विभागाने जारी केलेले सर्वात महत्वाचे कागदपत्र म्हणजे पॅन कार्ड. याला Permanent account number देखील म्हटले जाते. जे सध्याच्या काळात खूप महत्वाचे आहे. कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी पॅनकार्ड असणे बंधनकारक आहे. जर तुम्ही तुमचे पॅन कार्ड हरवले असेल तर त्याचे डुप्लिकेट कार्ड बनविण्यात वेळ लागतो. मात्र आता तुमचं टेन्शन कमी होणार आहे.

केंद्र सरकारने नुकतीच नवीन ई-फाइलिंग पोर्टल सुरू केले आहे. ज्यामध्ये तुम्ही ई-पॅन कार्ड डाउनलोड करू शकता, तेही अवघ्या ५ मिनिटांत. नवीन ई-फाईलिंग पोर्टलमध्ये काही अडचण येत असल्याचे समोर आले आहे. ते सुरळीत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या नवीन पोर्टलवरून तुम्ही ई-पॅन कार्ड कसे डाउनलोड करू शकता. जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया

- Advertisement -

ई-पॅन कार्ड डाउनलोड करण्याची प्रक्रिया

  • प्रथम तुम्हाला आयकर नवीन पोर्टल https://www.incometax.gov.in/iec/foportal ला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला ‘इन्स्टंट ई पॅन’ वर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर ‘न्यू ई पॅन’ वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा गमावलेला पॅन कार्ड क्रमांक टाकावा लागेल.
  • जर तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर आठवत नसेल तर तुमचा आधार क्रमांकाची नोंद करा.
  • यानंतर अटी व शर्ती वाचा आणि स्वीकारा.
  • त्यानंतर तुम्हाला नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल.
  • ओटीपी टाकल्यावर आणि तपशील वाचल्यानंतर प्रक्रिया कंन्फर्म करा.
  • त्यानंतर तुमचे पॅनकार्ड पीडीएफ तुम्हाला ईमेलवर येईल. जिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता.

पॅनकार्ड आधार कार्डशी जोडणे सरकारने बंधनकारक केले आहे. जर तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधारशी जोडले नसेल तर १ जुलैपासून तुमचे पॅन कार्ड अवैध मानले जाईल. पॅनकार्ड आधार कार्डशी जोडण्याची शेवटची तारीख ३० जून असून त्यानंतर तुम्हाला दंड देखील केला जाऊ शकतो.


Tokyo Olympics : मनप्रीत सिंग भूषवणार भारताच्या पुरुष हॉकी संघाचे कर्णधारपद; दोन उपकर्णधारांची निवड

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -