करोनापासून दूर राहायचय ? मग हे करा

करोनापासून दूर राहायच असेल तर करोनाग्रस्तांपासून लांब राहा असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. पण त्याचबरोबर करोनाची लागणच होऊ नये असे वाटत असेल तर तुम्ही काय खावे व कसे राहावे याबदद्लही सल्ला दिला आहे.

कच्च्या भाज्या खाणे टाळा
सॅलेड खाणं ही हल्लीची फॅशन आहे. तसे ते प्रकृतीसाठीही आवश्यक आहे. पण सद्याची करोना व्हायरसचा फैलाव पाहता कच्च्या भाज्या खाणे टाळा. कारण कच्चया भाज्यांवरच अधिक व्हायरस असण्याची शक्यता असते. यामुळे भाज्या स्वच्छ धुऊन घ्याव्यात. उकळून घ्याव्यात. नंतरच खाव्यात.

गरम पाणी प्या
व्हायरसबरोबर लढण्यासाठी गरम पाणी फायदेशीर आहे. असे अनेक डॉक्टर व तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गरम पाणी प्यायल्याने अन्नपचन होते. गॅसची समस्याही दूर होते. पण त्याचबरोबर सर्दी किंवा खोकला असेल तर गरम पाणी पिल्यामुळे छातीत कफ जमत नाही. त्यामुळे खोकला होत नाही. तसेच सर्दीमुळे घशात निर्माण होणारे व्हायरसही गरम पाण्यामुळे नष्ट होतात. त्यामुळे गरम पाणी पिणे आवश्यक आहे.

सतत हात धुणे
सतत हात धुतल्याने हातावरील व्हायरस नष्ट होतात. त्यामुळे हात नेहमी साबण किंवा सॅनिटायजरने धुवावे.

कच्चे किंवा अर्धेकच्चे मांस खाऊ नये
कच्च्या आणि अर्धवट शिजलेल्या मांसात व्हायरस असतात. ते तसेच खाल्यास व्हायरसची लागण होऊ शकते. यामुळे कच्चे किंवा हाफ फ्राय मांस खाणे कच्चे अंडे खाणे टाळावे.

अन्न शिजवूनच खावे
कुठलेही अन्न शिजवून खावे. कारम शिजवल्याने त्यातील व्हायरस नष्ट होतात.