घरदेश-विदेशमहिलांचा सन्मान करायचा असेल तर सुरुवात महाराष्ट्रापासून करा, प्रियंका चतुर्वेदींची मोदींवर टीका

महिलांचा सन्मान करायचा असेल तर सुरुवात महाराष्ट्रापासून करा, प्रियंका चतुर्वेदींची मोदींवर टीका

Subscribe

प्रियंका चतुरवेदी मोदींवर टीका केली. यावेळी हिलांचा सन्मान करायचा असेल तर सुरुवात महाराष्ट्रापासून करा, असे त्या म्हणाल्या.

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने लाला किल्ल्यावरून देशाल संबोधित केले. यावेळी त्यांनी महिलांचा अपमान करू नका. महिलांचा सन्मान करा, असे आवाहन देशवासियांनी केले. मोदींच्या या आवाहनानंतर शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी समाचार घेतला. महिलांचा सन्मान करायचा असेल तर त्याची सुरूवात महाराष्ट्रपासून करा, असा टोला प्रियंका चर्तुर्वेदी यांनी लगावला.

महिला बालकल्याण खाते पुरुषाकडे –

- Advertisement -

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एकही महिला नाही. महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण मंत्रालय एका पुरुषाकडे देण्यात आले आहे. एकीकडे महिला सन्मानाच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे सुली बाई बुली प्रकरणे होत आहे, अशी टीका करतानाच आधी महिलांना 33 टक्के आरक्षण द्या, अशी मागणीही प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे. त्या मीडियाशी संवाद साधत होत्या.

भ्रष्टाचाराचे आरोप असलेले लोक भाजपला भ्रष्ट बनवत आहेत –

- Advertisement -

यावेळी प्रियंका चतुर्वेदी यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपच्या कार्यालयात मोठी वॉशिंग मशीन लावली आहे. महाराष्ट्रातील बंडखोर आमदारांच्या केसेस आता थंड बस्तात ठेवून दिल्या आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले लोक आता भाजपला भ्रष्टाचारी पार्टी बनवत आहे, अशी टीका प्रियंका चतुर्वेदी यांनी केली.

…त्यांचे काय करायचे? –

देशात अनेक घराणी आहेत. त्यांची दुसरी आणि तिसरी पिढी आज भाजपमध्ये आहे. राजनाथ सिंह, अमित शहा, अनुराग ठाकूर, ज्योतिरादित्य सिंधिया, मुंडे आणि महाजन ही या कुटुंबांची काही उदाहरणे आहेत. त्याचे काय करायचे? असा प्रस्न  करत त्यांनी भाजपमधील घराणेशाहीवर टीका केली. शिवसेना, टीएमसी, आरजेडी, डीएमके, काँग्रेसचे नेतृत्व करणारे लोकांना जनतेने निवडून आले आहेत. आपण जनतेचा अपमान करत आहात, असेही त्यांनी सांगितले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -