महागाईचा भडका! ऑक्टोबरमध्ये १३ दिवसात CNG, PNG च्या दरात दुसऱ्यांदा वाढ

igl hike cng png price from 13 october know check cng png rate in your city
महागाईचा भडका! ऑक्टोबरमध्ये १३ दिवसात CNG, PNG च्या दरात दुसऱ्यांदा वाढ

देशात गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांना आधीच महागाईचा फटका सहन करावा लागत आहे. यातच आता सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतींमध्येही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे स्वयंपाकासाठी पाईपलाईनद्वारे येणाऱ्या पीएनजी गॅससाठी नागरिकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. इंद्राप्रस्थ गॅस लिमिटेडने नुकतचं दिल्ली, नोएडा, ग्रेड नोएडा, गाजियाबाद आणि गुरुग्रामसह अनेक शहारांमधील Compressed Natural Gas (CNG) आणि Piped Natural Gas (PNG) चे आज नवे दर जाहीर केले. ऑक्टोबरमध्ये गेल्या १३ दिवसात CNG, PNG च्या दरात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. आयजीएल कंपनीने आज सकाळी ट्वीट करत वाढते दर जाहीर केले. यापूर्वी १ ऑक्टोबर २०२१ ला नवे वाढते दर जाहीर केले होते.

आजच्या नव्या दरानुसार, दिल्लीत सीएनजी गॅसचे दर ४७.४८ रुपये प्रति किलोवरून ४९.७६ रुपयांवर पोहचले आहे. १ ऑक्टोबरला दिल्लीमध्ये सीएनजी २.२८ रुपये प्रति किलो महाग झाले आहे, तर पीएनजी २.१० रुपये प्रति एससीएम महाग झाले आहे.

‘या’ शहारांमधील सीएनजी गॅसच्या किंमती

अजमेर, पाली आणि राजसांमद – प्रति किलो ६५. ०२ रुपये

कानपूर, फतेहपूर आणि हमीरपूर- प्रति किलो ६६.५४ रुपये

नोएडा, ग्रेडर नोएडा आणि गाजियाबाद- प्रति किलो ५६. ०२ रुपये

गुरुग्राम – प्रति किलो ५८.२० रुपये

रेवाडी- प्रति किलो ५८.९० रुपये

करनाल आणि कैथल- प्रति किलो ५७.१० रुपये

मुजफ्फरनगर, मेरठ आणि शामली- प्रति किलो ६३.२८ रुपये

पीएनजीचे वाढते दर 

मुझफ्फरनगर, मेरठ आणि शामलीमध्ये आता पीएनजीसाठी (PNG) ३८.३७ रुपये मोजावे लागतील. तर दिल्लीत त्याची किंमत ३३.०१ SCM ऐवजी ३५.११ रुपयांवर गेली आहे. नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये पीएनजीचे नवे दर ३२.८६ रुपये झाले आहे. त्याचप्रमाणे, आता गुरुग्राममध्ये त्याची किंमत ३३.३१ क्यूबिक मीटर आणि रेवाडी आणि कर्नालमध्ये ३३.९२ प्रति क्यूबिक मीटर झाली आहे.

आयजीएलच्या माहितीनुसार, सीएनजी आणि पीएनजीच्या वाढत्या किंमतींचा वाहन मालकांच्या खिशावर परिणाम होणार नाही. मात्र ऑटोसाठी ही वाठ ६ पैशांची असेल तर टॅक्सीसाठी ११ पैसे आणि बससाठी १.६५ प्रति किमीने वाढेल.