घरदेश-विदेशPNG CNG Rate Hike : पेट्रोल- डिझेल, एलपीजीपाठोपाठ आता पीएनजी- सीएनजी महागले;...

PNG CNG Rate Hike : पेट्रोल- डिझेल, एलपीजीपाठोपाठ आता पीएनजी- सीएनजी महागले; जाणून घ्या आजचा दर

Subscribe

देशातील वाढत्या महागाईमुळे आधीच हैराण झालेल्या नागरिकांना आता इंधन दर वाढीचा बोजा सहन करावा लागतोय. पेट्रोल- डिझेल आणि एलपीडीच्या किंमतीत मोठी वाढ झाली. यानंतर आता पीएनजी- सीएनजीच्या दरात देखील वाढ झाली आहे. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने गुरुवारपासून दिल्ली आणि NCR मध्ये पीएनजीच्या दरात मोठी वाढ केली आहे. याचा वापर घरगुती गॅसप्रमाणे होतो.

यामुळे दिल्ली- एनसीआरमध्ये ग्राहकांना एलपीजी सिलेंडर किंवा पीएनजी वापरणे महाग झाले आहे. याचा फटका स्वयंपाक करणाऱ्या गृहिणींना सहन करावा लागणार आहे. IGL ने देशांतर्गत PNG च्या किमती 1 रुपये प्रति स्टँडर्ड क्यूबिक मीटरने वाढवून 36.61 रुपये प्रति युनिट केल्या आहेत. या नव्या किंमती आता 24 मार्चपासून लागू झाल्या आहेत.

- Advertisement -

दिल्लीत सीएनजीचे दर वाढले

आयजीएलने दिल्लीत सीएनजीच्या दरात मोठी वाढ केली आहे. 24 मार्चपासून दिल्लीत सीएनजी 59.51 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध झाले आहे. याआधी ते 59.01 रुपये दराने उपलब्ध होते. सीएनजीच्या दरात वाढ झाल्याने राजधानीतील वाहनांचे भाडेही महागणार आहे. याशिवाय खासगी वाहनचालकांनाही खिसा मोकळा करावा लागणार आहे.

पाहा तुमच्या शहरातील पीएनजीचा दर

  • नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये 35.86 रुपये प्रति SCM
  • गुरुग्राममध्ये 34.81 रुपये प्रति SCM
  • अजमेर, पाली, राजसमंदमध्ये 42.023 रुपये प्रति SCM
  • कानपूर, हमीरपूर आणि फतेहपूरमध्ये 38.50 रुपये प्रति SCM

एलपीजीच्या दरातही वाढ

देशात आधीच सरकारी तेल कंपन्यांनीही घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ केली होती. या वाढीनंतर दिल्लीत 14.2 किलोच्या सिलिंडरची किंमत 949.50 रुपयांवर पोहोचली आहे. इतकेच नाही तर गेल्या दोन दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतींमध्येही प्रतिलिटर 1.60 रुपयांनी वाढ झाली आहे.


IPL 2022 : यंदाच्या IPL सामन्यांवर दहशतवादी हल्ल्याचं सावट? वानखेडे स्टेडियमची दहशतवाद्यांकडून रेकी


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -