सीएनजीपाठोपाठ पीएनजी गॅसच्या दरातही वाढ; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

मागील काही दिवसांपूर्वी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली होती. त्यानंतर पीएनजी म्हणजेच पाइप्ड नॅचरल गॅसच्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपूर्वी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली होती. त्यानंतर पीएनजी म्हणजेच पाइप्ड नॅचरल गॅसच्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे. पीएनजीचा पुरवठादार इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने शुक्रवारी पीएनजीच्या दरात प्रति युनिट २.६३ रुपयांची वाढ केली आहे. (IGL increases rates by upto Rs 56.23)

पीएनजीच्या नव्या दरवाढीनुसार, दिल्लीत पीएनजी गॅस ५०.५९ रुपये प्रति घनमीटर (रु./प्रति एससीएम) वर गेला आहे. दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत पीएनजीच्या किमती दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. या नवीन किमती 5 ऑगस्टपासून लागू झाल्या आहेत.

राष्ट्रीय राजधानी आणि लगतच्या भागात पीएनजी आणि सीएनजीचा पुरवठा करणाऱ्या आयजीएलने याबाबत दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत पीएनजीची किंमत आता ५०.५९ रुपये प्रति घनमीटर असेल. आतापर्यंत तो ४७.९६ रुपये प्रति युनिट होता. तसेच, या वाढीमुळे गॅसच्या उत्पादन खर्चातील वाढ अंशतः भरपाई होईल, असेही ट्विट आयजीएलने शुक्रवारी ट्विट केले.

दरम्यान, याआधी २६ जुलै रोजी पीएनजीच्या किमतीत २.१ रुपये प्रति युनिट वाढ करण्यात आली होती.

पीएनजीचे नवे दर

 • दिल्ली- रु.50.59/ प्रति SCM
 • नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबाद- 50.46/- प्रति SCM
 • कर्नाल आणि रेवाडी- 49.40/- प्रति SCM
 • गुरुग्राम- ४८.७९/- प्रति SCM
 • मुझफ्फरनगर, मेरठ आणि शामली – 53.97/- प्रति SCM
 • अजमेर, पाली- 56.23/- प्रति SCM
 • कानपूर, हमीरपूर आणि फतेहपूर – 53.10/-प्रति SCM

दरम्यान, मुंबईत पुन्हा एकदा सीएनजी ६ रुपयांनी, तर घरगुती पाईप नैसर्गिक वायू ४ रुपये प्रति किलोने महाग झाला आहे. सीएनजी दरात करण्यात आलेली ही वर्षभरातील दुसरी सर्वात मोठी वाढ आहे. मुंबई महानगर क्षेत्रात आता सीएनजी ८६ रुपये प्रति किलो, तर पीएनजी ५२.५० रुपये प्रति एससीएम झाला आहे. महानगर गॅस लिमिटेडकडून मंगळवारी ही घोषणा करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील विविध शहरातील सीएनजीचे दर

 • नागपूर – ११६ रुपये
 • पुणे – ८५ रुपये
 • पिंपरी चिंचवड – ८५ रुपये
 • मुंबई ८० रुपये
 • नवी मुंबई – ८० रुपये
 • ठाणे – ८० रुपये
 • नाशिक – ६७.९० रुपये
 • धुळे – ६७.९० रुपये

हेही वाचा – मुंबईतील वाडिया रुग्णालयात भीषण आग, अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल