Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Chandrayan 3 बाबत गेहलोत सरकारमधील मंत्र्याचे अज्ञान; लोकांनी लावला डोक्याला हात, युझर्सनी...

Chandrayan 3 बाबत गेहलोत सरकारमधील मंत्र्याचे अज्ञान; लोकांनी लावला डोक्याला हात, युझर्सनी केले ट्रोल

Subscribe

Chandrayan 3 : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेतील चांद्रयान-3 (Chandrayan 3) चे विक्रम लँडर बुधवारी संध्याकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. यासह भारत हा पराक्रम करणारा जगातील चौथा देश आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातील पहिला देश ठरला आहे. चांद्रयान-3 चे सॉफ्ट लँडिंग होताच देशभरात आनंद साजरा करण्यात आला. अभिनेत्यांपासून ते नेत्यांपर्यंत सर्वांकडून या ऐतिहासिक सोहळ्याबद्दल अभिनंदन होत आहे. मात्र या गौरवशाली क्षणाची काही राजकारण्यांना केवळ अर्धी अपूर्ण माहिती असल्याचे समोर आले आहे. राजस्थानच्या गेहलोत सरकारमधील (Gehlot Government) मंत्री अशोक चंदना (Minister Ashok Chandana) यांनी चांद्रयान-3 मोहिमेच्या यशावर माध्यमांसमोर अजब वक्तव्य केलं. यानंतर त्यांना ट्रोल केलं जात आहे. (Ignorance of a minister in the Gehlot government regarding Chandrayan 3 People put their hands on the head users trolled)

हेही वाचा – ISRO : ‘चांद्रयान-3’ ने इतिहास रचताना लाइव्ह स्ट्रीमिंगचा मोडला रेकॉर्ड; एवढ्या लोकांनी पाहिले यशस्वी लँडिंग

- Advertisement -

14 जुलै रोजी चंद्रावर स्वारी करण्यासाठी अवकाशामध्ये झेपावलेल्या चंद्रयान-3 च्या पीएसएलव्ही या अवकाशयानाने तब्बल 3 लाख 84 हजार 400 किमी. अंतराचा प्रवास करून बुधवारी (23 ऑगस्ट) आपल्या निर्धारित वेळेत चंद्रावर पाऊल ठेवलं. यानंतर राजस्थानचे क्रीडा मंत्री अशोक चंदना यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशोक चंदना म्हणाले की, आपण यशस्वी झालो आणि सुरक्षित लँडिंग केले. चांद्रयानासोबत चंद्रावर गेलेल्या प्रवाशांना मी सलाम करतो. आपल्या देशाने विज्ञान आणि अवकाश संशोधनात आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्याबद्दल मी सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो. अशोक चंदना यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर लोक मजेशीर कमेंट करत आहेत, तसेच त्यांना ट्रोल करताना दिसत आहेत. मंत्री चंदना यांनी दिलेल्या वक्तव्यानंतर त्यांचे समर्थक याला जिभेचे चोचले म्हणू लागले आहेत. तर सोशल मीडियावर अनेक लोक अशोक चंदना यांच्या सामान्य ज्ञानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

अशोक चंदना कोण आहेत?

- Advertisement -

राजस्थानचे युवा क्रीडा मंत्री अशोक चंदना बुंदी जिल्ह्यातील हिंदोली विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. चंदना यांनी या विधानसभेतून सलग दोन वेळा निवडणूक जिंकली असून सध्या त्यांना गेहलोत गटाचे नेते मानले जात आहे. पोलो स्पोर्ट्स प्लेअर म्हणून अशोक चंदना यांची खास ओळख आहे.

हेही वाचा – Chandrayaan-3 नंतर आता इस्रोची ‘आदित्य एल-1’ मोहीम, सूर्याचा करणार अभ्यास

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत जगातील पहिला देश

बुधवारी (23 ऑगस्ट) ‘चांद्रयान-3’ ची लँडिंग प्रक्रिया पहाटे 5.30 वाजता (चंद्रावरील वेळेनुसार) सुरू झाली. रफ लँडिंग खूप यशस्वी झाल्यानंतर लँडरने पहाटे 5.44 वाजता उभी लँडिंग केली. तेव्हा चंद्रापासून ‘चांद्रयान-3’ चे अंतर 3 किमी होते. ‘चांद्रयान-3’ ने आपल्या 20 मिनिटांत चंद्राच्या शेवटच्या कक्षेतून 25 किमीचा प्रवास पूर्ण केला. त्यानंतर लँडर हळूहळू खाली उतरवण्यात आले. लँडरने संध्याकाळी 6.04 वाजता (भारतीय वेळेनुसार) चंद्रावर पहिले पाऊल ठेवले. अशा प्रकारे हा पराक्रम करणारा भारत जगातील चौथा आणि दक्षिण ध्रुवावर पोहचणारा जगातील पहिला देश ठरला आहे.

- Advertisment -