नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली येथे जी-20 शिखर परिषदेचे सूप वाजले असून, भारताने अध्यक्षपदाची सूत्रे ब्राझिल देशाकडे सोपवली आहेत. त्यामुळे पुढील जी-21 शिखर परिषद ही ब्राझिलमध्ये होणार आहे. मात्र त्याआधी ब्रिटीश मीडियाने (British Media) आरोप केले आहेत. ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्याकडे जी-20 शिखर परिषदेत दुर्लक्ष करण्यात आल्याचे मीडियाने म्हटले आहे. (Ignoring Rishi Sunak at G 20 British media alleges said)
द गार्डियनने या वृत्तपत्राने ‘ऋषी कोण?…’ असे शीर्षक देत एक लेख लिहिला आहे. या लेखात वृत्तपत्राने म्हटले की, स्वत:ला भारताचे जावई म्हणवून घेणाऱ्या ऋषी सुनक यांना तिथे काहीच किंमत मिळाली नाही. ऋषी सुनक यांनी त्यांचे भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी-20 मध्ये भेट घेतली. मात्र सर्व काही ब्रिटिश पंतप्रधानांच्या अपेक्षेप्रमाणे झाले नाही. वृत्तपत्राने ऋषी सुनक यांच्या कार्यक्रमातील बदल आणि दिल्लीतील लॉकडाऊनमुळे आलेल्या अडचणींवरही भाष्य केलं आहे.
हेही वाचा – कदाचित आम्ही सरकारला अडचणीत आणलं; राहुल गांधींनी ‘इंडिया वि. भारत’ वादावर केंद्राची उडवली खिल्ली
ऋषी सुनक यांना पसंतीक्रमातून डावलण्यात आले
द गार्डियन वृत्तपत्राने म्हटले की, ऋषी सुनक यांना भारतात अपेक्षेइतके लक्ष मिळाले नाही. 10 डाऊनिंग स्ट्रीटला ऋषी सुनक यांच्या स्वागतासाठी मोठ्या भव्यतेची अपेक्षा होती. कारण भारत आणि ब्रिटन या अनुक्रमे जगातील पाचव्या आणि सहाव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्था आहेत. भारतीय पंतप्रधानांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांची बैठक एक दिवस आधी होणार होती. मात्र ऋषी सुनक यांना पसंतीक्रमातून डावलण्यात आले आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांना बैठकीसाठी बोलवण्यात आले. जी-20 परिषदेच्या ठिकाणी कॉन्फरन्स रूममध्ये भारतीय पंतप्रधानांनी ऋषी सुनक यांची शेवटी भेट घेतली.
हेही वाचा – शेअर बाजारातील वाढीमुळे निफ्टी विक्रमी उच्चांकावर; पहिल्यांदाच ‘हा’ आकडा केला पार
जी-20 च्या निर्बंधांवरही वृत्तपत्राकडून आक्षेप
द गार्डियन वृत्तपत्राने आरोप करताना म्हटले की, केवळ भारतीय पंतप्रधानांनी ऋषी सुनक यांच्यासोबतची बैठक रद्द केली नाही तर व्यावसायिक अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानेही नियोजित कार्यक्रम पुढे ढकलला. ऋषी सुनक यांना जी-20 संमेलनादरम्यान विविध ठिकाणी निर्बंध घालण्यात आले होते, त्यामुळे ते संमेलनस्थळी पोहोचू शकले नाहीत. इतकंच नाही तर पंतप्रधान सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता त्यांच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये जेवायलाही जाऊ शकले नाहीत. कारण पंतप्रधान मोदींच्या आदेशानुसार दिल्ली शहर लॉकडाऊन करण्यात आलं होतं. त्यामुळे ऋषी सुनक आणि त्यांच्या पत्नीला दुसऱ्या हॉटेलमध्ये जेवण करावं लागलं. दरम्यान, जी-20 परिषदेत ब्रिटीश पंतप्रधानांनी भारतीय पंतप्रधान मोदींसोबतची भेट खूप चांगली असल्याचे सांगितले होते.