Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश Corona Spreading: IISER ने तयार केली ४४६ शहरांची यादी, जाणून घ्या तुमचं...

Corona Spreading: IISER ने तयार केली ४४६ शहरांची यादी, जाणून घ्या तुमचं शहर कोणत्या स्थानी

Related Story

- Advertisement -

देशात गेल्या वर्षभरापासून कोरोनाने अक्षरशः हैरान करून सोडले आहे. अशातच अद्याप कोरोनाचा फैलाव कमी झालेला नसून दिवसेंदिवस बाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. अशापरिस्थितीत पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड रिसर्चने (आयआयएसईआर) देशातील अशा शहरांचा मॅप तयार केला असून त्या शहरांमध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने होण्याचा धोका असल्याचे सांगितले जात आहे. यासह असेही सांगितले गेले की, केवळ महानगरांतून कोरोनाचा देशात जास्त फैलाव झाला आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान, ज्या शहरांची लोकसंख्या एक लाखाहून अधिक आहे अशा देशातील ४४६ शहरांचा आयआयएसईआरने अभ्यास केल्यानंतर हा मॅप तयार केला आहे. यामध्ये वरील महानगरांव्यतिरिक्त बंगलोर, हैदराबाद आणि चेन्नई शहराचा देखील समावेश आहे. या ४४६ शहरांच्या यादीमध्ये पुणे दहाव्या क्रमांकावर आहे. दरम्यान या संस्थेने कोरोनाचा प्रसार इतका का झाला हे जाणून घेण्याचा देखील प्रयत्न केला असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

आयआयएसईआरच्या भौतिकशास्त्र विभागाने हा मॅप तयार करण्यासाठी ट्रान्सपोर्टेशन नेटवर्क आणि मोबिलिटी पॅटर्नचा वापर केला आहे. ज्या अंतर्गत सर्वात कमी स्थानावर असलेल्या शहरात महामारीचा प्रादुर्भाव होण्याचा सर्वाधिक धोका आहे. संशोधन शास्त्रज्ञांच्या मते, या शहरांमधील वाहतूक व्यवस्था खूप मोठी आहे तसेच अनेक ठिकाणी ती वाहतूक व्यवस्था जोडली गेल्याने या विषाणूचा संसर्ग या शहरातून बाहेर पसरण्यास कारणीभूत ठरतो.

आयआयएसईआरने आपल्या संशोधनात हेदेखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला की एखाद्या शहरात महामारीचा प्रादुर्भाव पसरला तर त्यानंतर लगेच त्याचा परिणाम कोणत्या ठिकाणी होईल. उदाहरणार्थ, जर हा संसर्ग पुणे, महाराष्ट्रात पसरला तर मुंबईला सर्वाधिक धोका होईल, कारण दररोज दोन्ही शहरांमध्ये लोकांचं येणं-जाणं मोठ्या प्रमाणात होत असते. त्याचप्रमाणे सातारा १९ व्या, तर दुर्गम लातूर ५० व्या स्थानी असणार आहे. आयआयएसईआरच्या संशोधन पथकात सहभागी असलेले सचिन जैन यांनी असे सांगितले की, जर एखाद्या शहरात संसर्गजन्य रोग पसरला तर तो इतर शहरांमध्ये कधी पोहोचणार याचा संभाव्य वेळ निश्चित करण्यात मदत होऊ शकते.


Covid-19 नंतर आता भारतात आणखी जीवघेणा व्हायरस! ‘या’ ठिकाणी आढळला पहिला रूग्ण

- Advertisement -

 

 

- Advertisement -