IIT Baba Reaction On Ind – Pak Match : नवी दिल्ली : रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुबईत खेळवल्या गेलेल्या भारत – पाकिस्तान सामन्यात भारताने पाकिस्तानवर शानदार मात केली आणि उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले. भारताने 6 विकेट्सनी हा सामना जिंकला. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने शतकी खेळी करत भारताला हा विजय मिळवून दिला. मात्र, कुंभमेळ्यातून प्रसिद्ध झालेल्या आयआयटी बाबा अभय सिंह यांनी या सामन्यात भारत हरेल असे भविष्य वर्तवले होते. भारत जिंकल्याने त्यांची ही भविष्यवाणी खोटी ठरल्याचे समोर आले आणि सोशल मीडियावर ते चांगलेच ट्रोल झाले. (iit baba reaction on winning of team ind vs pak champions trophy virat kohli century)
भारतीय क्रिकेट संघाने या सामन्यात पाकिस्तानला चांगलीच मात दिली आणि आयआयटी बाबा अभय सिंह यांची ही भविष्यवाणी फेल गेली. त्यामुळे आता हे आयआयटी बाबा माफी मागताना दिसत आहेत. सोशल मीडियावर पोस्ट करत आपले कन्फ्यूजन झाल्याचे सांगत त्यांनी माफी मागितली आहे. भारत – पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांची मॅच नेहमीच रंगते. आणि या मॅचला तुफान गर्दी देखील असते. आणि हीच मॅच हरणार असे भाकित आयआयटी बाबाने वर्तवल्याने अनेकांची मॅचआधीच निराशा झाली होती.
हेही वाचा – S. Jaishankar : प्रत्येक गोष्टीसाठी भारतावर आरोप करणे हा मूर्खपणा, एस. जयशंकर यांनी बांगलादेशला खडसावले
मॅच जिंकल्यानंतर अभय सिंह यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सर्वांची माफी मागितली आहे. आपल्या या पोस्टमध्ये ते म्हणतात, मी जाहीररित्या सर्वांची माफी मागतो. ही सेलिब्रेशनची वेळ आहे. भारत जिंकेलच याचा मला ठाम विश्वास होता. त्याआधी त्यांनी म्हटले की, माझा गोंधळ झाला, त्यासाठी मला माफ करा. तर भारत जिंकल्यानंतर त्यांनी जी पोस्ट केली त्यात त्यांनी म्हटले होते की, भारताने पाकिस्तानला हरवले. विराट कोहलीने शतकी खेळी केली.
या विजयामुळे भारताचा दबदबा अधिकच वाढला आहे. या दिमाखदार विजयासाठी भारतीय टीमचे अभिनंदन. यासाठी त्यांनी एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. त्यात ते म्हणतात, मी असंच काहीही फेकत असतो, मला एवढं सिरीयसली कुठे घेता?
Sorry for the confusion😉 pic.twitter.com/zBpmgvj9rT
— Abhay Singh (IIT BOMBAY) (@Abhay245456) February 24, 2025
UNIBIT Games नावाच्या प्रोफाइलवरून पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडीओनुसार, हे आयआयटी बाबा म्हणत होते की, यावेळी आपण त्यांना हरवायचे. तेव्हा तर तुम्ही मान्य कराल ना. मी पहिल्यापासूनच सांगत होतो की, भारत जिंकणार नाही. यात त्यांनी विराट कोहलीचा देखील उल्लेख केला आहे. विराट भलेही सगळ्यांना सांगू दे की, काहीही करून आपल्याला जिंकायचंच आहे. पण, मी एकदा जिंकणार नाही सांगितलं म्हणजे नाही जिंकणार.
हेही वाचा – Maharahstra DA : राज्य सरकारी कर्मचार्यांचा डीए रखडला, एवढे कर्मचारी भत्त्याच्या प्रतीक्षेत