घरदेश-विदेशiit recruitment 2021 : लॉटरी लागली! आयआयटीमध्ये १२ विद्यार्थ्यांना १ कोटींचे पॅकेज

iit recruitment 2021 : लॉटरी लागली! आयआयटीमध्ये १२ विद्यार्थ्यांना १ कोटींचे पॅकेज

Subscribe

भारतातील सर्वाधिक प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध आयआयटी मुंबई देशातील सर्वात अव्वल संस्था आहे. त्यामुळे आयआयटी मुंबईतून शिक्षण पूर्ण करणाऱ्यांना मोठ्या पॅकेजची नोकरी मिळाली असे स्वप्न असते. मात्र यंदा आयआयटी मुंबईतील १२ विद्यार्थ्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. या १२ विद्यार्थ्यांना आयआयटी क्षेत्रातील नोकरीत तब्बल १ कोटींचे पॅकेज देण्यात आले आहे.

आयआयटी मुंबईच्या प्लेसमेंटचा पहिला टप्पा १८ डिसेंबरला पूर्ण झाला. या पहिल्या टप्प्यात विविध कंपन्यांकडून विद्यार्थ्यांना तब्बल १ हजार ७२३ जॉब ऑफर्स करण्यात आल्या. यातील १ हजार ३८२ विद्यार्थ्यांनी ऑफर्स स्वीकारल्या आहेत. अशी माहिती मुंबई प्लेसमेंट सेलकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

मागील वर्षीच्या प्लेसमेंटच्या आलेखाने यंदा मात्र उसळी घेतली आहे. २०१९ -२० मध्ये १ हजार १७२ विद्यार्थ्यांनी जॉब ऑफर्स स्वीकारल्या होत्या. त्यानंतर २०२०-२१ मध्ये ही संख्या कमी होत ९७३ वर पोहचली. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आयआयटी मुंबई प्लेसमेंटमध्ये ऑफर्सची संख्या ही ५९५ ने वाढलीय. तर स्वीकारलेल्या ऑफर्सची संख्या ४०० हून अधिक आहे.

आयआयटीच्या पहिल्या टप्प्य़ात इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी क्षेत्रात सर्वाधिक ऑफर्स मिळाल्या आहेत. सर्वात जास्त ऑफर्स या फायनान्स क्षेत्रातून आल्या आहेत. फायनान्स क्षेत्रातील ऑफर्सची संख्या जवळपास २८.४० लाख प्रतिवर्ष इतकी आहे. यानंतर आयटी सॉफ्टवेअर, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, कन्साल्टिंग अशा अनेक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना लाखो रुपयांचे पॅकेज मिळालेय. अशाप्रकारे पहिल्या टप्प्यात ११७२ विद्यार्थ्यांना जॉब ऑफर्स आल्या त्यातील १३८२ विद्यार्थ्यांनी ऑफर्स स्वीकारल्या आहेत.

- Advertisement -

प्लेसमेंट मिळालेल्या १५ विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करण्याची संधी मिळणार आहे. यात १ हजार १७२ पैकी फक्त १२ विद्यार्थ्य़ांचे नशीब फळफळले आहे. या १२ विद्यार्थ्यांना मोठी प्लेसमेंट मिळाली असून त्यांना जवळपास १ कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. त्यामुळे आयआयटीमुळे विद्यार्थी आता कोट्याधीश होणार आहेत.


Cold Weather : नागपुरात जीवघेण्या थंडीने गारठून तिघांचा मृत्यू ; शिर्डीतही यापूर्वी दोघांचा मृत्यू


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -