घरदेश-विदेशभूकंप येण्यापूर्वीच मिळणार मोबाईलवर अलर्ट, IIT रुडकीने तयार केलं एक खास अ‍ॅप

भूकंप येण्यापूर्वीच मिळणार मोबाईलवर अलर्ट, IIT रुडकीने तयार केलं एक खास अ‍ॅप

Subscribe

आयआयटी रुडकीने बुधवारी भूकंप येण्यापूर्वीच अलर्ट करणारे ‘उत्तराखंड भूकंप अलर्ट’ नावाचे एक मोबाईल अ‍ॅप लाँच केलं आहे. या अ‍ॅपचे दोन वर्जन एंड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार आहेत. या प्रोजेक्टला उत्तराखंड राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाने (USDMA) अर्थसहाय्य केलं आहे. उत्तराखंड भूकंपाच्या दृष्टीने सर्वाधिक सक्रिय क्षेत्र आहे. कारण याठिकाणी सर्वाधिक भूकंपाचे धक्के जाणवत असतात. यामुळे भूकंप येण्यापूर्वी नागरिकांना सतर्क करण्यासाठी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी बुधवारी हा नवा अ‍ॅप लाँच केला. भूकंपापूर्वी अलर्ट करणारे आयआयटी रुडकीचे हे देशातील पहिले अ‍ॅप आहे.

या प्रोजेक्टची सुरुवात भारत सरकाराच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या उत्तराखंडतील गढवाल क्षेत्रातील पायलट प्रकल्प येथे झाली. या प्रोजेक्टची यशस्वी चाचणी होताच उत्तराखंड सरकारने आयआयटीआरच्या ईईडब्ल्यू प्रोजेक्टचा विस्तार करण्यास मंजूरी दिली. ‘उत्तराखंड भूकंप अलर्ट’ या अ‍ॅपच्या माध्यमातून भूकंपापूर्वीचा अलर्ट देण्यात येतो. यामुळे तीव्र भूकंप होणार असल्याचा अलर्ट युजर्सला दिला जाते.

- Advertisement -

भूकंपामुळे जमिनीवर जोरदार धक्के बसतात. हे धक्के तरंगांमुळे जाणवतात. यामुळे जमिनीवरील विद्युत चुंबकीय गती मोठ्याप्रमाणात वाढते. यावेळी ईईडब्ल्यू सिस्टम या गतींचे मोजमाफ करते. यावर आयआयटी रुडकीचे संचालक प्रो. अजित चतुर्वेदी यांनी सांगितले की, अभिमान आहे की आयआयटीआरने भूकंपाची पूर्वसुचना देणारे हे मोबाईल अ‍ॅप तयार केले. यामुळे भूकंपामुळे होणारे नुकसान आणि शेजारील जिल्ह्यांना भूकंपाची पूर्वसूचना आणि तीव्रतेसंदर्भात तात्काळ सुचना देता येणार आहे.

ही सिस्टम सेंसर क्षेत्रातील ५ हून अधिक तीव्रतेच्या भूकंपांची माहिती मिळेल. यासाठी गढवाल आमि कुमाऊं या उच्च सेंसर सिस्टम लावली आहे. या सिस्टममधील डेटा आयआयटी रुडकीच्या ईईडब्ल्यू सिस्टम प्रयोगशाळा सीओईडीएमएम स्थित सेंट्रल सर्व्हरमध्ये येतो. हा डेटा स्ट्रीम करण्यासाठी उच्च कार्यक्षम संगणकीय माहितीचा वापर केला जाणार आहे. केंद्रीय सर्व्हर प्रक्रिया सतत 24 × 7 आधारावर डेटा पुनर्प्राप्त करते. यासाठी आयआयटीआरने उत्तराखंड सरकारला राज्यातील दोन प्रमुख शहरे (देहरादून आणि हळडवानी) मध्ये सार्वजनिक सायरन लावण्य़ास मदत केली जेणेकरून लोक आपत्तीबद्दल जागरूक होतील. मात्र या अ‍ॅपला इंटरनेटची आवश्यकता असते. इंटरनेट कनेक्शन सुरु असणाऱ्या युजर्सच्या फोनवर भूकंपाची पूर्वसुचना दिली जाते. तसचे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला जातो.

- Advertisement -

सावधान ! जुन्या नोटा – नाणी खरेदी विक्रीच्या आमिषाला बळी पडू नका, RBI जारी केली नोटीस


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -