Saturday, May 8, 2021
27 C
Mumbai
घर अर्थजगत क्या बात है! आयआयटीचा विद्यार्थी १५ महिन्यात बनला तब्बल ५ हजार कोटीचा...

क्या बात है! आयआयटीचा विद्यार्थी १५ महिन्यात बनला तब्बल ५ हजार कोटीचा मालक

सुरोजितने फेब्रुवारी २०२० मध्ये अमेरिकेतील सर्वात मोठ्या क्रिप्टो करेंसी एक्सचेंज कॉइनबेसमध्ये चीप प्रॉडक्ट मॅनेजर पोस्टपासून कामास सुरुवात केली.

Related Story

- Advertisement -

आयआयटी खडकपूरमधून शिक्षण पुर्ण करणाऱ्या एका माजी विद्यार्थ्यांने १५ महिन्यात तब्बल ५ हजार कोटीचा मालक होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. सुरोजित चॅटर्जी असे या विद्यार्थ्याचे नाव असून आता तो ५ हजार कोटी रुपयांचा मालक झाला आहे. फ्लिपकार्ट, गुगलसारख्या नावजलेल्या कंपन्यासह त्याने काम केले आहे. सुरोजितने फेब्रुवारी २०२० मध्ये अमेरिकेतील सर्वात मोठ्या क्रिप्टो करेंसी एक्सचेंज कॉइनबेसमध्ये चीप प्रॉडक्ट मॅनेजर पोस्टपासून कामास सुरुवात केली. याचवेळी कॉइनबेसमध्ये त्याने पंधरा महिन्यात जवळपास १८०.८ मिलियन डॉलरची म्हणजे भारतीय रुपयात जवळपास पंधराशे कोटी रुपये कमावले आहेत.

बुधवारी झालेल्या चांगल्या ट्रेडिंगमुळे कॉइन बेस्ट एक्सचेंजने कमाईची मोठी झेप घेतली. त्यामुळे कॉइन बेस्ट एक्सचेंजला येत्या पाच वर्षात शेअरचाही पर्याय उपलब्ध असणार आहे. सध्या शेअर बाजारात कॉइनबेसचा शेअर तब्बल ४६५.५ मिलियन डॉलर म्हणजे तीन हजार पाचशे कोटी रुपये इतका आहे.

- Advertisement -

खडकपूर आयआयटीमधून सुरोजित चॅटर्जी यांनी बीएससीचे पदवी शिक्षण पूर्ण केले. याचदरम्यान मॅक्स डेकसह काम करता करता त्यांनी कॉइनबेसचे संस्थापक ब्रायन आर्मस्ट्ऱॉंग आणि फ्रेड एहरसेम यांच्यासह कामास सुरुवात केली. यावेळी सुरोजित यांचा खूप आर्थिक फायदा झाला. या तिघांची हिस्सेदारी १६ हजार अरब डॉलरवर पोहचली आहे.

गुगलची मुळ कंपनी अल्फाबेट इंकसह सुरुवातीला तीन वर्षे सुरोजित चॅटर्जी यांनी काम केले. गुगल कंपनीच्या शॉपिंग प्लॅटफॉर्मवर ते काम करायचे. यापूर्वी मोबाईलवरील जाहिराती आणि अॅडसेन्सच्या उत्पादन आणि वितरण क्षेत्रात काम करण्याता अनुभव त्यांनी घेतला, तसेच फ्लिपकार्टमध्येही काही काळ काम केले. त्यानंतर गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात कॉइनबेसमध्ये कामावर रुजू झाले. अवघ्या काही महिन्यातच त्यांनी पंधराशे कोटी रुपये कमावले.

- Advertisement -

सध्या कॉईनबेसचे शेअर्स प्रति शेअर 381 डॉलरच्या दराने सुरू झाले. त्यानंतर या दरात प्रति शेअर 430 डॉलरपर्यंत वाढ झाली. तथापि, नंतर ते 328.28 डॉलरवर बंद झाले. बिटकॉइनबरोबरच ही कंपनी देखील सार्वजनिक झाली आहे. या कंपनीच्या ट्रेडिंग व्हॉल्यूममध्ये आता बिटकॉइन आणि इथरियमचा सर्वाधिक वाटा आहे. ही दोन्ही क्रिप्टोकरन्सी आतापर्यंतच्या उच्च स्तरावर व्यापार करीत आहेत. यावर्षी, बिटकॉइनची किंमत जवळपास दुप्पट झाली असून 64,000 डॉलरच्या जवळपास गेली.


 

- Advertisement -