घरदेश-विदेशइलैयाराजा, पी टी उषा राज्यसभेवर जाणार, पंतप्रधान मोदींनी ट्विट करून दिली माहिती

इलैयाराजा, पी टी उषा राज्यसभेवर जाणार, पंतप्रधान मोदींनी ट्विट करून दिली माहिती

Subscribe

दोघांनाही राष्ट्रपतींच्या कोट्यातून राज्यसभेवर पाठवण्यात आले आहे. यासोबतच व्ही. विजयेंद्र प्रसाद आणि वीरेंद्र हेगडे यांनाही राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे

नवी दिल्ली: प्रसिद्ध संगीतकार इलैयाराजा आणि धावपटू पी. टी. उषा यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ट्विट करून ही माहिती दिली. दोघांनाही राष्ट्रपतींच्या कोट्यातून राज्यसभेवर पाठवण्यात आले आहे. यासोबतच व्ही. विजयेंद्र प्रसाद आणि वीरेंद्र हेगडे यांनाही राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.

राज्यसभेतील नामनिर्देशित सदस्यांची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटद्वारे दिली आहे. आपल्या पहिल्या ट्विटमध्ये पंतप्रधानांनी लिहिले की, “व्ही. विजयेंद्र प्रसाद गारु हे अनेक दशकांपासून सर्जनशील जगाशी जोडलेले आहेत. त्यांच्या कलाकृतींतून भारताच्या वैभवशाली संस्कृतीचे दर्शन घडते आणि जागतिक स्तरावर त्यांचा ठसा उमटला आहे. राज्यसभेवर नामनिर्देशित झाल्याबद्दल अभिनंदन करतो.”

- Advertisement -

प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा

पंतप्रधानांनी दुसर्‍या ट्विटमध्ये लिहिले, “पी टी उषा जी प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आहे, क्रीडा क्षेत्रातील त्यांची कामगिरी सर्वत्र प्रसिद्ध आहे, परंतु नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करणारे त्यांचे कार्यही तितकेच कौतुकास्पद आहे. राज्यसभेवर नामनिर्देशित झाल्याबद्दल अभिनंदन करतो.” तिसर्‍या ट्विटमध्ये पंतप्रधान लिहितात की, “सर्जनशील प्रतिभा इलैयाराजाजी यांनी पिढ्यानपिढ्या लोकांना मंत्रमुग्ध केले. त्यांची कामे अनेक भावनांचे सुंदर चित्रण करतात. त्यांचा जीवनप्रवास तितकाच प्रेरणादायी आहे, ते एका तमीळ कुटुंबातून आले असून, त्यांनी बरेच काही साध्य केले. त्यांना राज्यसभेवर नामांकन मिळाल्याचा आनंद आहे.”


वीरेंद्र हेगडे यांच्या नावाची घोषणा करताना पंतप्रधानांनी लिहिले की, हेगडेजी समाजसेवेत नेहमीच पुढे असतात. मला त्यांच्या आरोग्य, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रात ते करत असलेल्या महान कार्याचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली. ते संसदीय कामकाज नक्कीच समृद्ध करतील.”

- Advertisement -


हेही वाचाः काँग्रेसच्या ‘त्या’ ७ आमदारांवर कारवाई करा, पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -