घरदेश-विदेशफक्त जीवच नाही तर Corona अनेकांच्या नोकऱ्यादेखील हिसकावतोय; जगात ५० कोटी लोकं...

फक्त जीवच नाही तर Corona अनेकांच्या नोकऱ्यादेखील हिसकावतोय; जगात ५० कोटी लोकं बेरोजगार

Subscribe

कोरोना विषाणूची दुसरी लाट आली तर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता...

कोरोना साथीच्या महामारीमुळे जगभरातील आर्थिक घडामोडींवर परिणाम झाला आहे. ज्यामुळे रोजगाराच्या संधी कमी झाल्या आहेत. तर लॉकडाऊनमुळे मोठ्या संख्येने लोक बेरोजगार झाले आहेत. नुकताच संयुक्त राष्ट्र संघटना इंटरनेशनल लेबर ऑर्गेनाइजेशनने (आयएलओ) एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. इंटरनेशनल लेबर ऑर्गेनाइजेशनच्या अहवालात असे म्हटले आहे की, जगभरात कोरोना महामारीमुळे ५०० कोटीहून अधिक लोक बेरोजगार झाले असल्याचा अंदाज आयएलओने लावला आहे.

आयएलओने आपल्या अहवालात दावा केला आहे की, कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने रोजगाराच्या समस्या निर्माण झाल्या आहेत तर यामुळे अधिकाधिक लोकांना फटका बसला आहेत. या वर्षाच्या अखेरपर्यंतदेखील ही परिस्थिती सुधारण्याची शक्यता कमी असल्याचे या अहवालात म्हटले आहे. कारण आर्थिक व्यवहार हळूहळू पूर्वपदावर परत येत आहेत. कामाचे तास कमी होण्याच्या आधारे बेरोजगारीच्या ५० कोटी आकडेवारीचा अंदाज लावण्यात आला आहे. अहवालानुसार, वित्तीय वर्ष २०१९-२०२० च्या तुलनेत या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कामाच्या तासात १७ टक्क्यांनी घट झाली आहे, जे ५० कोटी लोकांच्या नोकर्‍या गमावण्याच्या बरोबरीचे आहे.

- Advertisement -

जूनमध्ये आयएलओच्या अहवालात कोरोनाच्या संकटामुळे ४० कोटी लोक बेरोजगार होण्याचा अंदाज होता. आता, कामकाजाच्या आधारे, अहवालात असे म्हटले आहे की कोरोनामुळे १०० कोटीहून अधिक लोक बेरोजगार झाले असल्याचे चित्र आहे.आयएलओचे अध्यक्ष अध्यक्ष गाई राइडर यांच्या मते, लेबर मार्केटचे कोरोनामुळे झालेले नुकसान मोठे आहे. जागतिक स्तरावर कामगारांच्या उत्पन्नात १०.७ % घट झाली आहे. इतकेच नव्हे तर कोरोना विषाणूची दुसरी लाट आली तर परिस्थिती आणखी बिकट होईल, अशी भीती आयएलओने व्यक्त केली आहे.


इराणप्रतीचा अमेरिकेचा द्वेष विनाशाकडे नेणार?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -