घरCORONA UPDATEदेशात कोरोनामुळे २०० डॉक्टरांचा मृत्यू, आयएएमनं पंतप्रधानांना लिहिलं पत्र!

देशात कोरोनामुळे २०० डॉक्टरांचा मृत्यू, आयएएमनं पंतप्रधानांना लिहिलं पत्र!

Subscribe

देशात कोरोनामुळे चिंताजनक परिस्थिती असून दररोज रूग्णसंख्या वाढत आहे. तर दुसरीकडे मृताची संख्याही वाढत आहे. यात कोरोना लढाईत पहिल्या फळीत लढणाऱ्या डॉक्टरांची संख्या मोठी आहे. देशात आतापर्यंत २०० डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशननं (आयएएम) ही आकडेवारी जाहीर केली आहे. आयएएमनं पंतप्रधानांनी या विषयात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

मृत डॉक्टरांची आकडेवारी जाहीर

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या डॉक्टरांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. या माहितीनुसार देशात १९६ डॉक्टरांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. यात मृतांपैकी १७० डॉक्टरांचं वय ५० वर्षांपेक्षा अधिक होतं. मरण पावलेल्या डॉक्टरांपैकी ४० टक्के डॉक्टर जनरल प्रॅक्टिशनर्स होते, असं आयएएमनं म्हटलं आहे.

- Advertisement -

पंतप्रधानांना लिहीलं पत्र

आयएएमनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. केंद्र सरकारनं डॉक्टरांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेण्यासाठी पर्याय व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. सर्व क्षेत्रातील डॉक्टरांना सरकारच्या वतीनं आरोग्य व जीवन विमा देण्यात यावा, असंही पत्रात म्हटलं आहे.

आयएएम देशातील साडेतीन लाख डॉक्टरांचं प्रतिनिधित्व करणारी संघटना आहे. त्यामुळे हे नमूद करणं गरजेचं आहे की, कोरोना शासकीय व कासगी क्षेत्र असा भेदभाव करत नाही आणि सगळ्यांना समानपणे प्रभावित करत आहेत. असं आयएएमचे अध्यक्ष डॉ. राजन शर्मा म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -