बाबा रामदेव यांनी १५ दिवसांत माफी मागावी, नाहीतर १ हजार कोटींची भरपाई द्यावी – IMA

Nothing against Ramdev but': IMA chief on withdrawing complaint against yoga guru
बाबा रामदेवांनी अॅलोपॅथीक औषधांविरोधातील विधान मागे घेतल्या तक्रार मागे घेऊ, IMA चे स्पष्टीकरण

अॅलोपॅथी (Allopathy) डॉक्टर आणि उपचारा संदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणारे बाबा रामदेव यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल झाला आहे. १५ दिवसांत माफी मागा अन्यथा १ हजार कोटींची भरपाई द्या अशी भूमिका इंडियन मेडिकल असोसिएशनकडून (IMA) घेण्यात आली आहे. बाबा रामदेव यांना अब्रुनुकसानीची ही नोटीस आयएमएच्या उत्तराखंड डिव्हिजनकडून पाठवण्यात आली आहे.

या नोटीसमध्ये आयएमए उत्तराखंडने म्हटले आहे की, ‘जर योग गुरू बाबा रामदेव येणऱ्या १५ दिवसांत लिखित स्वरुपात माफी मागत नाहीत आणि वादग्रस्त केलेल्या वक्तव्याविरोधात व्हिडिओ पोस्ट करत नाही, तर त्यांनी १ हजार कोटींची भरपाई द्या.’

आयएमए उत्तराखंड युनिटचे अध्यक्ष डॉ. अजय खन्ना म्हणाले की, ‘रामदेव यांच्याकडे ठोस ज्ञान नाही आहे. मी बाबा रामदेव यांच्याशी आमने-सामने करण्यास तयार आहे. रामदेव यांना अॅलोपॅथीच्या संदर्भात जास्त माहिती नाही आहे, असे असूनही ते अॅलोपॅथी आणि या संबंधित डॉक्टरांच्या विरोधात आहे. ते फक्त वक्तव्य करतात.’

पुढे खन्ना म्हणाले की, ‘रामदेव यांच्या वक्तव्यामुळे कोरोनाविरोधातील लढाईत रात्रंदिवस काम करणाऱ्या डॉक्टरांचे खच्चीकरण झाले आहे. बाबा रामदेव सतत आपली औषधं विकण्यासाठी खोटं बोलत आहे,’ असा खन्ना यांनी दावा केला.

रविवारी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी अॅलोपॅथीविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत म्हणाले की, टअत्यंत दुर्दैवी वक्तव्य असून त्यांनी ते परत घ्यावे.’ ज्यानंतर बाबा रामदेव यांनी वक्तव्य मागे घेतले होते.

काय आहे बाबा रामदेव यांचे वक्तव्य?

रेमडेसिवीर, अँटीबायोटिक, प्लाझ्मा थेरपीवर बॅन आले, फॅव्ही फ्लू हे सगळ अपयशी ठरत आहे. तापाच कोणतही औषध उपयुक्त ठरत नाही. त्या व्हायरस, बॅक्टेरियाला, फंगसला ज्या कारणाने संसर्ग होत आहे त्यावर औषध देण्यात येत नाही. लाखो लोकांचा मृत्यू हा अॅलोपॅथिचे औषध खाल्याने झाली आहे. जितके मृत्यू ऑक्सिजन आणि हॉस्पिटलमध्ये उपचार न मिळल्याने झाले नाहीत, त्यापेक्षा अधिक मृत्यू हे अॅलोपॅथीचे औषध खाऊन झाले असल्याचे अतिशय धाडसी वक्तव्य बाबा रामदेव यांनी केले. मी खूपच मोठे वक्तव्य करत आहे, या वक्तव्यानंतर या मुद्द्यावर वाद निर्माण होऊ शकतो असेही बाबा रामदेव म्हणाले. स्टेरॉईड्समुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. लाखो लोकांच्या मृत्यूचे कारण अॅलोपॅथी आहे. अॅलोपॅथी संपुर्णपणे फेल आहे, असे मी म्हणत नाही. त्यावेळी मॉडर्न मेडिकल सायन्स आणि तंत्रज्ञानाला माझा विरोध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पण वेगवेगळे प्रयोग आणि त्याचे निष्कर्षावर त्यांनी बोट ठेवले.