Wednesday, August 4, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी धार्मिक यात्रा, निष्काळजीपणा थांबवला नाही तर तिसरी लाट होईल घातक - IMAचा...

धार्मिक यात्रा, निष्काळजीपणा थांबवला नाही तर तिसरी लाट होईल घातक – IMAचा इशारा

दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट येण्याचे अंतर खूप लांब नाही - आयएमए

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या जीवघेण्या दुसऱ्या लाटेच्या कहरनंतर केसेस कमी होत असल्यामुळे लोकांचा निष्काळजीपणा वाढला आहे. हाच निष्काळजीपणा तिसऱ्या लाटेच्या आमंत्रणासाठी जबाबदार ठरू शकतो. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (IMA) डॉक्टरांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे आणि एक पत्र जारी केले आहे. जर लोकांचे भटकणे, धार्मिक यात्रा आणि प्रवासावर रोख लागली नाही तर कोरोनाची तिसरी लाट भयावह असेल, असा इशारा आयएमएने पत्राद्वारे दिला आहे.

आयएमएने म्हटले आहे की, ‘पर्यटन, प्रवास आणि धार्मिक श्रद्धा आवश्यक आहेत, परंतु आता काही महिने थांबणे चांगल्यासाठी आहे. जगाकडून आपल्याला शिकण्याची गरज आहे. कोणत्याही महामारीच्या इतिहासाकडे लक्ष्य द्या. तिसऱ्या लाटेला टाळता येऊ शकत नाही. तसेच दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट येण्याचे अंतर खूप लांब नाही आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगली पाहिजे. लोकं बेफिकरपणे हिल स्टेशनवर फिरत आहेत, हे वाईट आहे.’ जेव्हा काल, सोमवारी जगन्नाथ यात्रा सुरू झाली त्याच दिवशी आयएमएने पत्र जारी केले आहे. सध्या उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सरकार कावड यात्रेला मंजूरी देण्याबाबत चर्चा करत आहे.

- Advertisement -

आयएमएने पुढे म्हटले आहे की, ‘ज्याप्रकारे कार्यक्रमांना मान्यता देण्यात येत आहे आणि लसीकरण न करता लोकांना बिनधास्त मोठ्या संख्येने एकत्र जमण्याची परवानगी दिली जात आहे. हेच तिसऱ्या लाटेला गती देईल. पर्यटनाच्या स्थळी एकत्र जमलेल्या लोकांच्या गर्दीमध्ये कोरोना नियमांचे पालन होणे अशक्य दिसत आहे. हेच लोकं संसर्ग पसरविण्यात मदत करतील आणि तिसऱ्या लाटेची गती वाढवतील.’ त्यामुळे आयएमएने राज्यांना परिस्थितीचे गांभीर्य समजून घेऊन एकत्र गर्दी करण्यावर बंदी घालण्याचे आवाहन केले आहे.

‘गेल्या दीड वर्षाची लढाई असूनही यातून झालेल्या नुकसानीपासून आपल्याला शिकायला हवे. जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करून आणि कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून तिसऱ्या लाटेचा सामना करणे सोपे होईल. तसेच तिसऱ्या लाटेचा परिणाम देखील कमी होईल. पण जर पर्यटन आणि सध्याच्या कार्यक्रमावर बंदी घातली नाहीतर तिसरी लाट वेळेपूर्वी येईल आणि अधिक कहर करेल,’ असे आयएमए म्हणाले.


- Advertisement -

हेही वाचा – लवकरच झायडस कॅडिलच्या लसीला भारतात मिळणार मान्यता, १२ ते १८ वयोगटातील मुलांना मिळणार डोस


- Advertisement -