घरताज्या घडामोडीबाबा रामदेव यांच्याविरोधात देशद्रोहाच्या आरोपाखाली कारवाई करा, IMAचे मोदींना पत्र

बाबा रामदेव यांच्याविरोधात देशद्रोहाच्या आरोपाखाली कारवाई करा, IMAचे मोदींना पत्र

Subscribe

बाबा रामदेव यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात द्रेशद्रोहाच्या आरोपाखाली कारवाई करण्याची मागणी आयएमएने केली.

इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA)ने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र (IMA writes to PM Narendra Modi) लिहून पतंजलीचे मालक योग गुरू बाबा रामदेव यांच्या विरोधात देशद्रोहाच्या आरोपाखाली कारवाई (action against Ramdev under sedition charges) करण्याची मागणी केली आहे. पत्रात आयएमएने म्हटले आहे की, ‘रामदेव यांच्याद्वारे चुकीच्या सूचना आणि माहिती देणारे अभियान रोखले पाहिजे. लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही १० हजार डॉक्टर आणि लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे, असे बाबा रामदेव यांनी वक्तव्य केले असून हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. त्यामुळे रामदेव यांच्याविरोधात देशद्रोहाच्या आरोपाखाली कारवाई करा. ‘

- Advertisement -

नेमकं पत्रात काय लिहिले आहे?

पंतप्रधान मोदी यांच्या नावे इंडियन मेडिकल असोसिएशनने आपल्या पत्रात लिहिले आहे की, ‘आयएमए सातत्याने १८ वर्ष वयोगटातील लसीकरण करण्यासाठी तुमच्या वचनबद्धतेविषयी संदेश देत आहे. भारत सरकार आणि मॉर्डन मेडिकल हेल्थ केअर व्यावसायिकांमुळे आजपर्यंत भारतात २० कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. जगातील हे सर्वाधिक वेगवान लसीकरण आहे. आम्ही भारतात लस बनवण्यासाठी आणि इतर देशांतून लसीचे डोस भारतात वापरण्यास परवानगी दिल्याबद्दल तुमचे आभारी आहोत. तसेच एक दिलासादायक बाब म्हणजे ज्या लोकांनी लसीचा डोस घेतला आहे, त्यामधील ०.०६ टक्के लोकांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे पाहण्यास मिळाली आहेत आणि खूप कमी लोकांमध्ये फुफ्फुसात संसर्ग झाला. त्यामुळे लस आपल्या अनेक लोकांचा जीव वाचत आहे, हे सिद्ध झाले आहे. तसेच देशात गंभीर संक्रमणाच्या प्रकरणात कमी करू शकतो.’

आयएमएने पंतप्रधानांनी केलेल्या संबोधनात लसीकरणाच्या उपयुक्तेबद्दल आणि कोरोना उपचारासाठी दिलेल्या सल्लाबद्दल आभार मानले आहेत. शिवाय आयएमएने रविवार होणाऱ्या ‘मन की बात’ कार्यक्रमात मोदींनी तसे बोलण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisement -

बाबा रामदेव यांच्यासंदर्भात आयएमएने लिहिले आहे की, ‘आम्ही एक बाबत लक्ष्यात आणून इच्छितो की, एका व्हिडिओत कोरोना लसीचा डोस घेतल्यानंतरी १० हजार डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे आणि लाखो लोकांचा मृत्यू अॅलोपॅथिमुळे झाला आहे, असा दावा केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो व्हिडिओ पतंजलि उत्पादनांचे मालक रामदेव यांचा आहे.’


हेही वाचा – ‘कोणाचा बाप रामदेवला अटक करू शकत नाही’, बाबा रामदेव यांचे नवीन आव्हान


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -