घरदेश-विदेशबंगालच्या सागरात धडकणार 'सीतरंग' चक्रीवादळ; IMD चा 'या' राज्यांना इशारा

बंगालच्या सागरात धडकणार ‘सीतरंग’ चक्रीवादळ; IMD चा ‘या’ राज्यांना इशारा

Subscribe

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने रविवारी संध्याकाळी चक्रीवादळात रुपांतर झाले आहे, सीतारंग हे चक्रीवादळ बांग्लादेश किनारपट्टीच्या दिशेने सरकत आहे. हे चक्रीवादळ बेटाच्या दक्षिणेला सुमारे 520 किमी आणि दक्षिण पश्चिम बांगलादेशच्या बारिसालपासून 670 किमी अंतरावर आहे. याच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) 24 आणि 25 ऑक्टोबरसाठी एक अॅडव्हायजरी जारी केली आहे. IMD च्या माहितीनुसार, 25 ऑक्टोबरपर्यंत बंगालच्या उपसागरातील ऑफशोअर क्रियाकलाप स्थगित करण्यात आले आहे. यासोबत पश्चिम बंगलाच्या उत्तर आणि दक्षिण 24 परगना आणि पूर्व मिदनापूर जिल्ह्यात वादळाच्या संभाव्य प्रभावाचा इशारा देण्यात आला आहे. (imd advisory issued regarding cyclone siting west bengal fisherman are advised not to go near sea)

IMD च्या निवेदनानुसार, पश्चिम बंगालच्या उपसागरात आणि पूर्व मध्ये बंगालच्या उपसागरात तसेच पूर्व मध्ये बंगालच्या उपसागराच्या लगतच्या भागात तीव्र चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांना 25 ऑक्टोबरपर्यंत समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. संभाव्य नुकसानीचा अंदाज वर्तवताना विभागाने म्हटले की, गवताच्या झोपड्यांचे नुकसान होण्याची शक्यता खूप जास्त आहे.

- Advertisement -

विभागाच्या सल्ल्यानुसार, कच्च्या रस्त्यांचे मोठे नुकसान होऊ शकते आणि पक्क्या रस्त्यांचे किरकोळ नुकसान होऊ शकते. यासोबतच महापालिका आणि नगरपालिकेच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ ‘सीतारंग’ ईशान्येकडे सरकण्याची आणि 24 ऑक्टोबर रोजी तीव्र चक्री वादळात तीव्र होण्याची शक्यता आहे.

IMD नुसार, वाऱ्याचा वेग 40-50 किमी प्रतितास 60 किमीपर्यंत आणि हळूहळू उत्तर आणि दक्षिण 24 परगणा आणि पूर्व मिदनापूर जिल्ह्यांमध्ये 60-80 किमी प्रतितास वेगाने 90 किमी प्रतितास पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान चक्रीवादळाच्या तयारीबद्दल कोलकाता महानगरपालिकेचे महापौर-इन-काउंसिल देबाशीष कुमार म्हणाले की, आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे. त्यामुळे नियंत्रण कक्ष आणि शहरातील प्रत्येक कार्यालयात 24 तास पथके तैनात करण्यात येणार आहेत. दरम्यान कोलकत्ता, हावडा आणि हुगळीत सोमवारी आणि मंगळवारी रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे.


मालगाडीचे २० डबे घसरले; नागपूर-मुंबई रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -