घरताज्या घडामोडीऐन उन्हाळ्यात वाळवंटात बरसणार पाऊस; IMDने दिला बंगाल उपसागरात चक्रीवादळाचा इशारा

ऐन उन्हाळ्यात वाळवंटात बरसणार पाऊस; IMDने दिला बंगाल उपसागरात चक्रीवादळाचा इशारा

Subscribe

मागील काही दिवसांपासून अनेक राज्यांत वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली आहे. दिल्लीत काल एनसीआरमध्ये सलग चौथ्या दिवशी पाऊस पडला. यावेळी हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. राजस्थान आणि बिहारसह अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्यांकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

राज्यस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, बंगाल, दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमध्येही पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. यासोबतच बंगाल, दिल्लीसह काही राज्यांमध्ये पुढील दोन दिवस पाऊस पडू शकतो. तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यामुळे चक्रीवादळ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

गेल्या एक आठवड्यापासून संततधार पाऊस पडत आहे. ढगांच्या गडगडाटामुळे आकाशात ढगाळ वातावरण तयार झालं आहे. समुद्र किनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे रुप धारण होण्याची शक्यता आहे.

आपत्ती व्यवस्थापन विभागाचा इशारा

- Advertisement -

आपत्ती व्यवस्थापन विभागानेही यासंदर्भातील माहिती जिल्हाधिकाऱ्यांना पाठवून सतर्क राहण्यास सांगितले आहे. अलिपूर स्थित हवामान विभागाचे प्रादेशिक संचालक मृत्युंजय महापात्रा यांनी म्हटले आहे की, बंगालच्या उपसागरात 5 मे ते 11 मे दरम्यान चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. या कालावधीत मच्छिमारांना समुद्रात जाण्याची परवानगी नाही आणि लोकांनी विनाकारण बाहेर पडू नये, असा सल्ला आपत्ती व्यवस्थापनाकडून देण्यात आला आहे.

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. अमरावती जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आंबा आणि संत्री कुजली आहेत. कांद्याचे पीक उद्ध्वस्त झाले आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी आणि गेवराई तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नांदेड जिल्ह्यातील ४ तालुक्यात आज सकाळी जोरदार पाऊस पडला. आता पुढील पाच दिवसही महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


हेही वाचा : राज्यात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाची


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -