घरदेश-विदेशआर्थिक वर्षे २०२२ च्या GDP मध्ये होईल कपात, विकास दर ९.५ टक्के...

आर्थिक वर्षे २०२२ च्या GDP मध्ये होईल कपात, विकास दर ९.५ टक्के राहण्याची शक्यता -IMF

Subscribe

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) ने आर्थिक वर्ष २०२१ -२२ मध्ये विकास दरात ११ टक्क्यांनी घट करत ९.५ टक्के केला आहे. यासंदर्भात एक रिपोर्ट मंगळवारी जाहीर करण्यात आला आहे. यापूर्वी आयएमएफने जीडीपीमध्ये १२.५ टक्के वाढण्याच्या शक्यता वर्तवण्यात आली होती. मार्च ते मे २०२१ या काळात कोरोनाची दुसरी लाट वाढू लागली. याचा थेट परिणाम आर्थिक व्यवहारांवर झाला. यातच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमुळे अर्थव्यवस्थेसमोर धोका आणखी वाढू शकतो.

ग्लोबल इकॉनॉमिक फोरकास्टिंग एजन्सी ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सने भारतीय अर्थव्यवस्थेविषयी आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे की, कोरोना रुग्णसंख्या घटल्यानंतर राज्यांनी लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली. परंतु आर्थिक दृष्टीकोनातून महत्त्वाच्या असलेल्या सर्वाधिक लोकसंख्येच्या राज्यात लसीकरण मोहिम अद्यापही वाढली नाही. आर्थिक वर्ष २०२१ मध्ये भारताचा जीडीपी ७.३ टक्क्यांनी घसरला. मात्र २०२२-२३ आर्थिक वर्षात आर्थिक वाढीचा दर ८.५ टक्के वाढण्याची शक्यता आयएमएफने वर्तवली आहे. हा दर एप्रिल महिन्यापेक्षा ६.९ टक्क्यांहून अधिक आहे.

- Advertisement -

आयएमएफ व्यतिरिक्त इतर अनेक जागतिक आणि देशांतर्गत संस्थांनीही चालू आर्थिक वर्ष २०२१-२२ मधील भारताच्या जीडीपी वाढीच्या दरात घट होईल असा अंदाज वर्तवला आहे. गेल्या महिन्यात एस अँड पीने भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज वित्तीय वर्ष २०२२ साठी ९.५ टक्के आणि २०२२-२३ मध्ये ७.८ टक्के ठेवला आहे. जागतिक बँकेच्या अंदाजानुसार एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ दरम्यान भारताची जीडीपी वाढ ८.३ टक्के असू शकते.

एशियन डेव्हलपमेंट बॅंकेने (एडीबी) गेल्या आठवड्यात याच काळात जीडीपी वाढीचा अंदाज एप्रिलमधील ११ टक्क्यांनी घट करत १० टक्के केला आहे. अमेरिकन एजन्सी मूडीजचा असा अंदाजही आहे की, मार्च २०२२ अखेरच्या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था आता ९.३ टक्के दराने वाढेल.

- Advertisement -

ग्लोबल ग्रोथ ६ टक्के वाढण्याची अपेक्षा

आयएमएफच्या अहवालानुसार, जागतिक अर्थव्यवस्थेची ग्रोथ २०२१ मध्ये ६ टक्के आणि २०२२ मध्ये ४.९ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. मात्र २०२१ च्या जागतिक वाढीच्या अंदाजात कोणताही बदल झालेला नाही. एप्रिलच्या अहवालातही आयएमएफचे मूल्यांकन समान होते. मात्र एडवांस्‍ड इकोनॉमी आणि इमर्जिंग मार्केट व डे‍वलपिंग इकोनॉमीमधील अंतर मोठे आहे.

आयएमएफचे चीफ इकॉनॉमिस्ट गीता गोपीनाथ यांनी ब्लॉग पोस्टमध्ये लिहिले आहे की, जागतिक ग्रोथबाबत आमचे अंदाज बदलत नाहीत. पण, त्याची रचना बदलली आहे. गोपीनाथ पुढे सांगतात की, आयएमएफच्या अंदाजानुसार, कोरोना साथीच्या आजारामुळे एडवांस्‍ड इकोनॉमीतील दरडोई उत्पन्नात २.८ टक्क्यांनी घट झाली आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -