घरदेश-विदेशमंदीचा परिणाम आयटी क्षेत्रावर; नव्या आर्थिक वर्षात 40 टक्के नोकऱ्यांची घट?

मंदीचा परिणाम आयटी क्षेत्रावर; नव्या आर्थिक वर्षात 40 टक्के नोकऱ्यांची घट?

Subscribe

नवी दिल्ली : जागतिक आर्थिक मंदीचा सर्वाधिक परिणाम आयटी क्षेत्रावर (IT sector) दिसून येत आहे. जगभरासह भारतात मोठ्या प्रमाणावर आयटी कंपन्यामध्ये नोकर कपातीचे प्रमाण वाढले आहे. आर्थिक मंदीचा परिणाम कॅम्पस हायरिंगवर दिसून येत आहे.

‘इकॉनॉमिक टाईम्स’च्या वृत्तानुसार आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये आयटी क्षेत्रात 40 टक्क्यांपर्यंत नोकर कपात होण्याची शक्यता आहे. टीमलीज डेटाच्या अहवालानुसार वर्ष 2023-24 या आर्थिक वर्षात भारतातील आयटी कंपन्या 40 टक्क्यांपर्यंत नोकर कपता तसेच कमी भरती करू शकतात.

- Advertisement -

हेही वाचा – मुख्यमंत्री दाढीला कात्री लावतील का? सावरकरप्रेमावरून ‘सामना’तून शिंदेंना टोला

टीमलीजच्या डेटानुसार 2023 आर्थिक वर्षात आयटी कंपन्यांनी एकूण 2.8 लाख लोकांची भरती केली असली तरी पुढील वर्षापर्यंत त्यात 30 ते 40 टक्क्यांची मोठी घट होण्याची शक्यता आहे. आर्थिक मंदीमुळे येत्या काही दिवसांत कंपन्यांचा ग्रोथ रेट कमी होणार आहे. त्याचा परिणाम आयटी क्षेत्रातील नोकर भरतीवर तसेच कॅम्पस हायरिंगवर दिसून येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

- Advertisement -

रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक आव्हाने वाढली असतानाच अमेरिका आणि युरोपमधील बँकिंग संकटामुळे अडचणी अनेक पटींनी वाढल्या आहेत. त्यामुळे आयटी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये मागील वर्षाच्या नफ्यात मोठी घट झाली आहे. बदलत्या जागतिक परिस्थितीमुळे भारतीय आयटी कंपन्यांना कमी पैसा खर्च करायचा असल्यामुळे नोकर कपता आणि नवीन भरती प्रक्रिया कमी होऊ शकते.

हेही वाच – भारतातील सर्वाधिक महागडी प्रॉपर्टी मुंबईत, ‘या’ उद्योगपतीने खरेदी केला लक्झरी ट्रिप्लेक्स अपार्टमेंट

आयटी क्षेत्रातील सर्वाधिक नोकरकपात
अमेरिकेच्या आयटी सेक्टरमध्ये या वर्षी 3 लाखांहून अधिक नोकर कपात झाल्याचा ‘ब्लूमबर्ग’ने अहवाल दिला आहे. 500 हून अधिक आयटी कंपन्यांनी 1.5 लाखांहून अधिक लोकांना जानेवारी ते मार्च 2023 दरम्यान कामावरून काढून टाकले आहे. गेल्या काही महिन्यांतील नोकरकपातीमुळे भारतातील आयटी क्षेत्रातील किमान 36,400 लोक बेरोजगार झाले आहेत. तर 2022 मध्ये 1.6 लाख लोकांना टेक कंपन्यांमधून काढून टाकण्यात आले आहे. यामध्ये ट्विटर, मेटा, अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्टसारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -