घरताज्या घडामोडीकेंद्राचा मोठा निर्णय! वैयक्तिक वापरासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स परदेशातून मागवता येणार

केंद्राचा मोठा निर्णय! वैयक्तिक वापरासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स परदेशातून मागवता येणार

Subscribe

ही सूट केवळ ३१ जुलै २०२१ पर्यंतच असल्याचे परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (DGFT) सांगितले आहे.

भारतामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. देशात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. ही समस्या दूर करण्याचे केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरु असून आता त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. वैयक्तिक वापरासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स परदेशातून ऑनलाईन पद्धतीने मागवण्याची केंद्राकडून परवानगी देण्यात आली आहे. हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स पोस्ट, कुरियर किंवा ई-कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातून मागवता येणार आहेत. ही सूट केवळ ३१ जुलै २०२१ पर्यंतच असल्याचे परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (DGFT) सांगितले आहे.

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स ही मशीन हवेतून ऑक्सिजन बनवते. कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज असल्याने वैयक्तिक वापरासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स परदेशातून ऑनलाईन पद्धतीने मागवण्याची केंद्राकडून परवानगी देण्यात आली आहे. आतापर्यंत अशी सवलत केवळ जीव वाचवणार्‍या औषधांना होती. मात्र, आता तीच सूट हवेतून ऑक्सिजन बनवणाऱ्या मशीनला देण्यात आली आहे.

- Advertisement -

ऑक्सिजन सिलेंडरमध्ये केवळ विशिष्ट प्रमाणातच ऑक्सिजनचा साठा असतो. मात्र, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सला ही मर्यादा नसते. तसेच या मशीनमध्ये ऑक्सिजन भरण्याची आवश्यकता नसते, त्याऐवजी ही मशीन स्वतः ऑक्सिजन तयार करते. सरकारच्या निर्णयानंतर आता परदेशातून ही मशीन सहज खरेदी करता येईल.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -