Wednesday, February 24, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश Allahabad Bank खातेदारांना 'हे' नवीन नियम लागू

Allahabad Bank खातेदारांना ‘हे’ नवीन नियम लागू

चेक बुक, पासबुक, मोबाईल बँकिंगमधील अनेक निमयांत बदल

Related Story

- Advertisement -

केंद्र सरकारकडून अनके सार्वजिनक बँकांचे खाजगीकरण सुरु आहे. छोट्या सार्वजनिक बँकांचे मोठ्या सार्वजनिक बँकांमध्ये विलनीकरण केल्याने काही मोजक्याच सरकारी बँका आता शिल्लक राहिल्या आहे. त्यामुळे बँक खातेधारकांनाही नव्या नियमांचे बंधन येत आहेत. यातच आता अलाहाबाद बँकचे ( allahabad bank) इंडियन बँकेमध्ये विलगीकरण करण्यात आले. त्यामुळे अलाहाबाद बँक खातेधारकांसाठी आजपासून नवीन नियम लागू करण्यात आले. या नव्या नियमानुसार ग्राहकांना ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना IFSC कोड वापरणे बंधनकारक असणार आहे.

यासाठी खातेदारकांना ऑनलाईन बँकिंगसाठी indoASIS App डाऊनलोड करावा लागणार आहे. आज सकाळी ९ वाजता या App वापराला सुरुवात केली जाणार आहे. त्याप्रमाणे आईएफएससी कोड, मोबाइल बँकिंग अॅप, चेक बुक आणि पासबुक निमयांमधील बदलही आजपासून लागू करण्यात आले आहेत. तसेच आरटीजीएस (RTGS), एनईएफटी (NEFT), आईएमपीएस (IMPS) सेवांसाठी ‘IDIB’ कडून सुरु होणारा नवा IFSC कोड होम ब्रांचमधून घेऊ शकतात किंवा www.indianbank.in/amalgamation या वेबसाईटवरुन लॉग इन करुनही घेऊ शकतात. ग्राहकांची गैरसोय होऊन नये यासाठी अलाहबाद बँक व्यवस्थापनाकडून ग्राहकांना वेळोवेळी सुचना दिल्या जात होत्या.

सध्याच्या चेकबुकला सहा महिन्याची वैध्यता

- Advertisement -

अलाहाबाद बँक नियमात जरी आजपासून बदल झाले असले तरी खातेदारकांचे चेकबुकला सहा महिन्यांची वैध्यता असणार आहे. चेकबुकप्रमाणे एटीएम देखील ग्राहक सहा महिने वापरु शकणार आहेत. ग्राहक अधिक माहितीसाठी कस्टमर केअर नंबर 1800-425-00000 वर कॉस करु शकतात. तसेच ऑनलाईन बँकिंगसाठी http://indianbank.net.in या संकेतस्थळाचा वापर करु शकता. यावेबसाईटमध्येच ग्राहकांना नव्या नियमांनुसार जुन्या बँकेसंदर्भातील कागदपत्रं कशी अपलोड करायची याची माहिती मिळेल. ग्राहकांना अडचणी येऊ नये यासाठी पूर्ण काळजी घेण्यात आली आहे.

 


- Advertisement -

हेही वाचा- बँक ऑफ महाराष्ट्रासह या चार बँकांचं होणार खासगीकरण


 

 

 

- Advertisement -