घरअर्थजगतकर्मचारी भविष्य निर्वाह निधी सदस्यांसाठी महत्त्वाची बातमी, रेकॉर्डब्रेक नोंदणी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी सदस्यांसाठी महत्त्वाची बातमी, रेकॉर्डब्रेक नोंदणी

Subscribe

महिला आणि पुरुषांच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात ३.५० लाख महिला ईपीएफओमध्ये जोडल्या गेल्या आहेत. हा आकडा गेल्यावर्षीपेक्षा ६.९८ टक्के अधिक आहे. महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि ओडिशामधून इपीएफओ अंतर्गत नव्याने येणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

नवी दिल्ली – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (Employees Provident Fund) म्हणजे ईपीएफओने (EPFO) सप्टेंबर २०२२ मध्ये १६.८ लाख सबस्क्राबर्स जोडले आहेत. सप्टेंबर २०२१ पेक्षा यंदा ९.१४ टक्के अधिक कर्मचारी जोडण्यात आले आहेत. या महिन्यातील ग्राहक गेल्या आर्थिक वर्षात नोंदवलेल्या मासिक सरासरीपेक्षा 21.85 टक्के अधिक आहे. ईपीएफओने आपल्या ट्विटर हँडलवर ही माहिती दिली आहे.

हेही वाचा – मुंबई पहिल्या क्रमांकावर… पण जीएसटी बुडविण्यात; एकूण 68 जणांवर कारवाई

- Advertisement -

ईपीएफओने दिलेल्या माहितीनुसार, 2,861 नवीन आस्थापनांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी पीएफची सुविधा लागू केली आहे. म्हणजेच, या कंपन्यांनी EPFO ​​आणि MP कायदा, 1952 चे पालन करण्यास सुरुवात केली आहे. EPFO ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 16.8 लाख सदस्यांपैकी 9.34 लाख सदस्यांची पहिल्यांदाच EPFO ​​पोर्टल अंतर्गत नोंदणी झाली आहे.


18-25 वयोगटातील बहुतेक कर्मचारी

- Advertisement -

नव्याने नोंदणी झालेले सदस्य हे 18 ते 25 वयोगटातील कर्मचारी आहेत, जे 16.8 लाख आहे. 18 ते 21 वयोगटातील 2.94 लाख कर्मचारी EPFO ​​मध्ये जोडले गेले आहेत. आणि 2.54 लाख सदस्य 21 ते 25 वयोगटातील आहेत. नव्याने जोडले गेलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या समोर येत असताना या सुविधेतून बाहेर पडणाऱ्या सदस्यांचीही संख्या अधिक आहे. यंदा ७.४९ लाख सदस्य या योजनेतून बाहेर पडले आहेत. परंतु नवीन संस्था किंवा कंपन्यांद्वारे पुन्हा जोडले गेले आहेत. दुसरीकडे, ईपीएफओमधून मासिक आधारावर बाहेर पडणाऱ्या सदस्यांची संख्या मागील महिन्याच्या तुलनेत सुमारे 9.65 टक्क्यांनी कमी आहे.

हेही वाचा ऑक्टोबरमध्ये जीएसटीपोटी जमा झाले 1.52 लाख कोटी, एप्रिलनंतरचे दुसरे सर्वोच्च संकलन

महिला आणि पुरुषांच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात ३.५० लाख महिला ईपीएफओमध्ये जोडल्या गेल्या आहेत. हा आकडा गेल्यावर्षीपेक्षा ६.९८ टक्के अधिक आहे. महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि ओडिशामधून इपीएफओ अंतर्गत नव्याने येणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -