सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी! घरगुती सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, नवे दर जाहीर

पाच किलोच्या सिलिंडरमध्ये १८ रुपयांनी वाढ झाली आहे. बुधवारी सकाळीच तेल कंपन्यांनी (Oil Company) हे नवे दर जाहीर केले आहेत. १९ मे नंतर घरगुती सिलिंडरच्या किंमतीत बदल करण्यात आला नव्हता.

lpg prices in india are the lowest among other countries

गेल्या काही दिवसांपासून घरगुती सिलिंडरच्या (Domestic Cylinder) दरात सातत्याने वाढ होत आहे. हजार पार गेलेल्या एलपीजी सिलिंडरच्या (LPG Cylinder) किंमतीत आता पुन्हा ५० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे नव्या किंमतीनुसार १४ किलोचा सिलिंडर आता १०५३ रुपयांवर पोहोचला आहे. तर, पाच किलोच्या सिलिंडरमध्ये १८ रुपयांनी वाढ झाली आहे. बुधवारी सकाळीच तेल कंपन्यांनी (Oil Company) हे नवे दर जाहीर केले आहेत. १९ मे नंतर घरगुती सिलिंडरच्या किंमतीत बदल करण्यात आला नव्हता. (Important news for housewives Big increase in domestic lpg cylinder prices, new rates announced)

हेही वाचा – व्यावसायिक सिलिंडर महिन्याभरात ३०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर

नव्या दरांनुसार, १४ किलोच्या सिलिंडरची किंमत मुंबईत १०५२.५० रुपये, दिल्लीत १०५३ रुपये, कोलकातामध्ये १०७९ रुपये आणि चेन्नईमध्ये १०६८ रुपये पोहोचला आहे. तर, १९ किलोच्या सिलिंडरची किंमत दिल्लीत २ हजार १२.५० पैसे, कोलकातामध्ये २ हजार १३२ रुपये, मुंबईत १ हजार ९७२ रुपये तर चेन्नईमध्ये २ हजार १७७ रुपये झाली आहे.

एकीकडे घरगुती वापाराच्या सिलिंडरमध्ये वाढ होत असताना व्यावसियक सिलिंडरात गेल्या महिन्याभरात दोनदा कपात करण्यात आली आहे. १ जुलै रोजी १९८ रुपयांनी व्यावसायिक सिलिंडर स्वस्त झाला होता, तर आजच्या नव्या दरानुसार ८.५० रुपयांनी घट करण्यात आली आहे.

व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती (१९ किलो)

दिल्ली- २ हजार १२.५० रुपये
मुंबई- १ हजार ९७२.५० रुपये
कोलकाता- २ हजार १२.५० रुपये
चेन्नई- २ हजार १७७.५० रुपये

२०० रुपये प्रति सिलिंडर सबसिडी

जनतेला महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत प्रति सिलिंडर २०० रुपये सबसिडी जाहीर केली होती. ही सबसिडी वर्षाला फक्त 12 सिलिंडरपर्यंत उपलब्ध असेल. सरकारच्या या निर्णयाचा 9 कोटींहून अधिक ग्राहकांना फायदा झाला आहे.