घरदेश-विदेशसरकारी नोकरी करु इच्छिणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

सरकारी नोकरी करु इच्छिणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Subscribe

सरकारी नोकरी करावी, अशी अनेकांची इच्छा असते. त्यामुळे देशभरातील लाखो विद्यार्थी प्रयत्न करत असतात. तुम्ही देखील जर सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. केंद्र सरकार स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे भरती मंडळ आणि इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड पर्सनल सिलेक्शनमधील रिक्त पदे भरण्यासाठी सरकार कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट घेणार आहे. विशेष म्हणजे या पदासांठी एका एजन्सीमार्फत कम्प्युटरवर ही परीक्षा घेतली जाणार आहे.

केंद्र सरकार सीईटीमार्फत परीक्षा घेण्याची शक्यता

दरवर्षी ग्रूप बी आणि ग्रूप सी मार्फत सरकार एक लाख २५ हजार जागांची भरती करते. ग्रूप बी आणि ग्रूप सी मधील पदांसाठी सध्या स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल भर्ती मंडळ आणि आयबीपीएसमार्फत भरती केली जाते. मात्र, आता केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार परीक्षा घेणारी एजन्सी नॉन-टेक्निकल पदांवर पदवी, बारावी आणि दहावी पास असणाऱ्यांसाठी सीईटी परीक्षा घेण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हेही वाचा – दिव्यांगांसाठी खूशखबर; सरकारी नोकरीत मिळणार ४ टक्के आरक्षण


 

- Advertisement -

केंद्र सरकारने सूचना मागवल्या

दरम्यान, कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट या परीक्षेची अंमलबजावणीपूर्वी वैयक्तिक, सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाने नोटीस जारी केली आहे. ‘सरकारी नोकरीसाठी इच्छूक उमेदवारांना विविध परीक्षांना सामोरे जावे लागते. पण सर्व परीक्षांसाठी योग्यता एकसारखीच असते. या परीक्षांचे विविध टप्पे असतात’, असे त्यांनी जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे. केंद्र सरकारने या प्रस्तावावर लोकांकडून सूचना मागवल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -