घरदेश-विदेशइम्रान खान यांच्यावर देशाविरुद्ध कट रचण्याचा आरोप; पाक मंत्र्याचा धक्कादायक खुलासा

इम्रान खान यांच्यावर देशाविरुद्ध कट रचण्याचा आरोप; पाक मंत्र्याचा धक्कादायक खुलासा

Subscribe

नवी दिल्ली : पाकिस्तान गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकटाच्या गर्तेत बुडत चालला आहे, याशिवाय काही दिवसांपूर्वी इम्रान खान (Imran Khan) यांच्या अटकेनंतर पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. या दोन्ही घटनांमधून पाकिस्तानमधील राजकीय उलथापालथ थांबण्याचे नाव घेत नाही आहे. सत्ताधारी विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच ठेवल्या आहेत. दरम्यान, पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह (Home Minister Rana Sanaullah) यांनी दावा केला आहे की, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे (PTI) प्रमुख इम्रान खान यांचा पक्ष कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना बदनाम करण्याचा कट रचत आहेत. याबाबत गुप्तचर यंत्रणांनी फोन टॅपिंगमधील संभाषण उघड केले आहे. (Pak minister accused Imran Khan of plotting against the country)

सनाउल्लाह यांनी शनिवारी (27 मे) रात्री पत्रकार परिषदेत आरोप केला की, कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींना चुकीच्या गुन्ह्यात अडकवणे आणि नंतर हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणे हे या कारवाईचे उद्दिष्ट आहे. त्यांनी सांगितले की, देशाच्या एजन्सींनी फोन टॅपिंगमध्ये पाकिस्तान पीटीआय नेत्याच्या घरावर छापा टाकताना बलात्काराचा खोटा खटला रचण्याचे संभाषण उघड केले आहे. मात्र हा दावा करताना राणा सनाउल्लाह यांनी कोणतेही पुरावे दिलेले नाहीत.

- Advertisement -

इम्रान खान यांनी दिले प्रत्युत्तर
राणा सनाउल्लाह यांनी केलेल्या आरोपवर इम्रान खान यांनी रविवारी (28 मे) ट्वीट करताना प्रत्युत्तर दिले आहे. इम्रान खान म्हणाले की, कारागृहात महिलांशी गैरवर्तन होत असल्याबद्दल काही शंका असतील तर या प्रमाणित गुन्हेगाराच्या पत्रकार परिषदेने अशा सर्व शंका दूर कराव्यात. पण ते स्पष्टपणे प्रसारमाध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत आहे. शांततेने आंदोलन करण्याचा अधिकार बजावत असताना या फॅसिस्ट सरकारकडून महिलांवर कधीही अत्याचार आणि छळ झाला नाही.

- Advertisement -

60 हून अधिक नेत्यांनी सोडले पीटीआयला
दरम्यान, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या परिसरातून निमलष्करी दलाच्या जवानांनी अटक केली होती, त्यानंतर देशात हिंसक निदर्शने सुरू झाली होती. या अटकेच्या निषेधार्थ, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लाहोर कॉर्प्स कमांडर हाऊस, मियांवली एअरबेस आणि फैसलाबादमधील आयएसआय इमारतीसह डझनभर लष्करी आस्थापनांची तोडफोड केली होती. या घटनेनंतर इम्रान खान यांच्या पीटीआयमधील 60 हून अधिक नेत्यांनी पक्षाची साथ सोडली आहे. पक्ष सोडणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये सरचिटणीस असद उमर, ज्येष्ठ नेते फवाद चौधरी आणि माजी मंत्री शिरीन मजारी यांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -