बिलावल भुत्तो पाकिस्तानची बदनामी करताहेत; इम्रान खानचा आरोप

bilawal bhutto

 

नवी दिल्लीः भारत दौऱ्यावर असलेले परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो झरदारी यांच्यामुळे पाकिस्तानची जगभरात बदनामी होत आहे. भारत दौरा करुन त्यांना काय साध्य होणार आहे, असा आरोप तहरीक-ए-इंसाफ पार्टीचे प्रमुख आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे.

पाकिस्तान आर्थिक संकटात आहे. त्यात भुत्तो यांच्या भारत दौऱ्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे. मुळात हा दौरा करुन भुत्तो यांना काय साध्य होणार आहे,अशी टीका इम्रान खान यांनी भुत्तो यांच्यावर केली आहे.

एससीओ (Shanghai Cooperation Organisation) बैठकीदरम्यान भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर (Minister of External Affairs S Jaishankar) यांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला आणि अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला (Pakistan) लक्ष्य केले. दहशतवादाचा कहर सुरूच आहे. पण दहशतवाद हा कोणत्याही प्रकारे समर्थनीय ठरू शकत नाही आणि तो थांबलाच पाहिजे. मग तो सीमेपलीकडील दहशतवाद असो किंवा इतर सर्व प्रकारच्या दहशतवाद असो, असे आमचे ठाम मत आहे.

गोव्यातील पणजी येथे शुक्रवारपासून एससीओ परराष्ट्रमंत्र्यांची परिषद सुरू झाली आहे. या बैठकीचा मूळ उद्देश दहशतवादाचा मुकाबला करणे हा आहे. बैठकीपूर्वी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांनी सदस्य देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांचे स्वागत केले. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो झरदारीही (Bilawal Bhutto Zardari) हे देखील यासाठी भारतात दाखल झाले आहेत. त्यांच्यासमोरच जयशंकर यांनी सीमेपलीकडील दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला.

तर बिलावल भुत्तो यांनीही दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. नागरिकांची सुरक्षा ही आपली संयुक्त जबाबदारी आहे. दहशवाद हा जगासाठी मोठा धोका आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावर आपण एकमेकांना लक्ष्य करणे थांबवले पाहिजे, असे वक्तव्य भुत्तो यांनी केले. त्यावर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी भुत्तो यांच्यावर निशाणा साधला. कदाचित भुत्तो यांनी त्यांच्या मनातील गोष्ट बोलून दाखवली. कोणत्या गोष्टीचा कसा फायदा घ्यावा हे त्यांना चांगलच माहीत आहे, अशी टीका मंत्री शंकर यांनी केली. या टिकेवरुन इमरान खान यांनी बिलावल यांच्या भारत दौऱ्यावर प्रश्न उपस्थित केले