घरदेश-विदेशइम्रान खान घेणार युरोपची मदत; लोकशाही पद्धतीने निवडणुकांचा आग्रह

इम्रान खान घेणार युरोपची मदत; लोकशाही पद्धतीने निवडणुकांचा आग्रह

Subscribe

नवी दिल्लीः पाकिस्तानमधील तहरीक-ए-इंसाफचे प्रमुख व माजी पंतप्रधान इम्रान खान आता ब्रिटन आणि युरोपातील देशांची मदत घेणार आहेत. पाकिस्तान सरकारने स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका घ्याव्यात, यासाठी इमरान खान आंतराराष्ट्रीय समुहाची मदत घेणार आहेत.

इमरान खान व त्यांच्या पक्षवर तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांवर सुरु असलेल्या कारवाईचा निषेध ब्रिटन व युरोप देशांमध्ये नोंदवला जात आहे. आंतराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांना याबाबत पत्र लिहिण्यात आले आहे. ब्रिटन व युरोप देशांतील सरकारलाही पाकिस्तानमधील परिस्थितीबाबत पत्र लिहिण्यात आले आहे.

- Advertisement -

इमरान खान यांच्या पार्टीचे प्रवक्ते साहिबजादा जहांगीर यांनी सांगितले की, परदेशात जे विरोध करत आहेत ते आमच्या पक्षाचे सदस्य आहेत. त्यांचे कुटुंब पाकिस्तानात आहे. ते परदेशातून आपल्या कुटुंबांना कोट्यवधी रुपये पाठवत असतात. पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या परिस्थितीमुळे ते त्रस्त आहेत. आम्हाला तेथील देशांकडून कोणतीही मदत नको. पण पाकिस्तानात लोकशाही पद्धतीने निवडणुका व्हाव्यात एवढेच आमचे म्हणणे आहे.

दरम्यान, इमरान खान यांना पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने मोठा झटका दिला आहे. इम्रान खान यांची खासदारकीही रद्द करण्यात आली आहे. तोशखाना प्रकरणी निवडणूक आयोगाने इम्रान खान यांची खासदारकी रद्द केली आहे. शिवाय, इम्रान खान यांच्यावर चुकीचे उत्तर दाखल केल्याचा आरोपही करण्यात आल्याची माहिती आहे.

- Advertisement -

इम्रान खान 2018 मध्ये पंतप्रधान झाले. अरब देशांच्या भेटींमध्ये त्यांना तेथील राज्यकर्त्यांकडून महागड्या भेटवस्तू मिळाल्या होत्या. इम्रानने त्यांना तोशखान्यात जमा केले होते. पण नंतर इम्रान खानने ते तोशखान्यातून स्वस्तात विकत घेतले आणि नफ्यात विकले. या संपूर्ण प्रक्रियेला त्यांच्या सरकारने कायदेशीर परवानगी दिली होती. विरोधकांनी याविरोधात निवडणूक आयोगाकडे याचिका केली होती. निवडणूक आयोगाने इमरान खान यांची खासदारकी रद्द केली आहे. तसेच त्यांच्यावर अटकेचीही टांगती तलवार आहे. तूर्त न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. मात्र आंतरराष्ट्रीय देशांची व संघटनांची मदत घेतल्याने इम्रान खान यांना नेमका काय लाभ होणार आहे याची चर्चा सध्या सुरु आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -