घरदेश-विदेशअल कादिर प्रकरणात इम्रान खान कडेकोट बंदोबस्तात हायकोर्टात हजर; बुशरा बीबीला मिळाला...

अल कादिर प्रकरणात इम्रान खान कडेकोट बंदोबस्तात हायकोर्टात हजर; बुशरा बीबीला मिळाला जामीन 

Subscribe

नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran khan) यांना गेल्या आठवड्यात अटक झाल्यानंतर कॉर्प्स कमांडरच्या घराला जाळपोळ केल्याप्रकरणी आणि झालेल्या हिंसाचाराच्या आरोपांवर आज (15 मे) लाहोर उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी इम्रानची पत्नी बुशरा बीबीला (bushra bibi) अल कादिर प्रकरणात २३ मेपर्यंत जामीन मंजूर करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इम्रान खान यांच्या अटकेनंतर त्यांच्या समर्थकांनी पाकिस्तानमध्ये हिंसाचाराच्या घटना घडवून आणल्या होत्या. यावेळी समर्थकांनी लाहोरमधील कॉर्प्स कमांडर हाऊसला आग लावली होती आणि त्यानंतर ९ मे च्या हिंसाचारा राज्य इमारती आणि लष्करी प्रतिष्ठानांवर हल्ले करून मोठ्या प्रमाणावर नुकसान इम्रान खान यांच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणांवर आज सुनावणी पार पडली.

- Advertisement -

तत्पूर्वी, पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने फौजदारी खटला चालवण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. परंतु गुरूवारी (11 मे) इस्लामाबाद हायकोर्टाने तोशाखाना प्रकरणी सुनावणीला स्थगिती देताना म्हटले होते की, इम्रान खान यांच्यावर कोणताही फौजदारी खटला चालणार नही. त्यानंतर शुक्रवारी (12 मे) अल कादिर ट्रस्ट प्रकरणी न्यायालयाने इम्रान खान यांना दोन आठवड्यांचा जामीन मंजूर करत दिलासा दिला होता. परंतु पुन्हा अटकेच्या भीतीने इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या आवारात काही तास घालवल्यानंतर इम्रान खान शनिवारी आपल्या लाहोर निवासस्थानी परतले.

इम्रान खान यांना 9 मे रोजी अटक झाली होती
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर तोशखाना प्रकरणी अटकेच्या कारवाईची टांगती तलवार होती. या प्रकरणी 9 मे रोजी इम्रान खान इस्लामाबाद न्यायालयात हजर झाले होते. त्यानंतर बाहेर न्यायालयाच्या बाहेर पडत असताना नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोने (NAB) त्यांना अल कादिर ट्रस्ट प्रकरणात अटक केली होती. यानंतर पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान यांची इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या परिसरातून केलेली अटक बेकायदेशीर ठरवून हे प्रकरण उच्च न्यायालयाकडे पाठवले होते. परंतु इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानमध्ये उसळलेल्या हिंसाचारात पंजाब प्रांतातील सहभागी 3,500 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. यातील बहुतेकजणांवर दहशतवादविरोधी न्यायालयात खटला चालवला जाणार असल्याची माहिती पंजाबचे पोलीस महानिरीक्षक डॉ. उस्मान अन्वर यांनी रविवारी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -