घरदेश-विदेशImran Khan arrest : इम्रान खान यांची मुक्तता; सुप्रीम कोर्ट म्हणाले, अटक...

Imran Khan arrest : इम्रान खान यांची मुक्तता; सुप्रीम कोर्ट म्हणाले, अटक बेकायदा

Subscribe

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने (Pakistan Supreme Court) माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांची अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानचे सरन्यायाधीश उमर अता बंदियाल (Umar Ata Bandial) यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय पीठाने पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे नेते इम्रान खान यांची तत्काळ सुटका करण्याचे आदेश दिले, त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. सुटकेनंतर इम्रान खान यांनी लोकांना शांततेचे आवाहन केले.

- Advertisement -

अल कादिर ट्रस्ट (Al Qadir Trust case) प्रकरणात इम्रान खान यांना मंगळवारी अटक करण्यात आली होती. भ्रष्टाचाराच्या इतर प्रकरणांमध्ये जामीन घेण्यासाठी इम्रान खान हे इस्लामाबाद उच्च न्यायालयात आले असताना नॅशनल अकाऊंटेबिलिटी ब्युरोने (एनएबी) त्यांना न्यायालयाच्या आवारातून अटक केली होती. त्यावर देखील न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. इम्रान खान यांना न्यायालयाच्या आवारातून अटक करणे, हे अपमानजनक असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले. उच्च न्यायालय किंवा अन्य न्यायालयातून आरोपीला अटक करता येत नाही. तुम्ही न्यायालयाचा अनादर करू शकत नाहीत, असे न्यायालयाने एनएबीला सुनावले.

आम्ही तुम्हाला सोडण्याचे आदेश देत आहोत, पण तुमच्या अटकेनंतर देशात झालेल्या हिंसाचाराचा तुम्हाला निषेध करावा लागेल, असे सरन्यायाधीशांनी इम्रान खान यांना सुनावले. तर, हायकोर्टातून मला पळवून नेण्यात आले आणि रिमांडमध्ये मला लाठ्यांने मारहाण करण्यात आल्याचा आरोप इम्रान खान यांनी सुटकेनंतर केला.

- Advertisement -

इम्रान इस्लामाबाद शुक्रवारी उच्च न्यायालयात होणार हजर
सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खानला शुक्रवारी (12 मे) इस्लामाबाद उच्च न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. तुम्हाला (इमरान खान) उच्च न्यायालयाचा निर्णय स्वीकारावा लागेल, असे पाकच्या सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले.

अटकेनंतर इम्रान खानसमर्थक आक्रमक
माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. इम्रान खान यांच्या समर्थकांनी बुधवारी (10 मे) रात्री हिंसाचार, जाळपोळ आणि दंगली घडवताना कारचे शोरूम, मेट्रो स्टेशन आणि चेकपॉईंट पोटवून दिले होते. त्यांनी लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला करण्याबरोबरच कॉर्प्स कमांडरचे घर आणि बँकाही लुटल्या. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांच्या खासगी निवासस्थानाला आग लावल्याचे सांगण्यात येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -