Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश Imran Khan Arrested : पाकिस्तानात परिस्थिती चिघळली; सोशल मीडियावर बंदी

Imran Khan Arrested : पाकिस्तानात परिस्थिती चिघळली; सोशल मीडियावर बंदी

Subscribe

नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान (Imran Khan) यांना अल कादिर ट्रस्ट प्रकरणात मंगळवारी अटक करण्यात आली असून यानंतर पाकिस्तानची परिस्थती चिघळली आहे. इम्रान खान यांचे अनेक समर्थक रस्त्यावर उतरून जाळपोळ आणि तोडफोड करत आहेत. त्यामुळे पोलिसांनी संपूर्ण पाकिस्तानात जमावबंदीचे आदेश लागू केले असून सरकारने सोशल मीडिया साईट्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

इम्रान खान यांच्या अटकेनंतर त्यांच्या समर्थकांनी थेट लष्करी कार्यलयांवर हल्ला केला. याशिवाय त्यांच्याकडून अनेक ठिकाणी जाळपोळ देखील करण्यात येत आहे. बलुचिस्तानमधील क्वेटा येथे पाकिस्तानी लष्कराने समर्थक आंदोलकांवर गोळीबार केला. यावेळी अनेक आंदोलक जखमी झाले आहेत, तर काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानी सरकारने ट्विटर, फेसबुक आणि यूट्युब सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने अफवांवर अंकुश ठेवण्यासाठी असे केले आहे. पाकिस्तानी माध्यमांनुसार सोशल मीडिया साईट्स वापरण्याची फक्त सरकारी संस्थांना परवानगी दिली आहे. याशिवाय पाकिस्तानच्या सरकारी इमारतींची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.

- Advertisement -

इम्रान खान यांच्यावर भ्रष्टाचार, दहशतवाद, दंगा भडकवणे आदी अनेक प्रकरणांत गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 2 प्रकरणांमध्ये जामिनासाठी ते मंगळवारी उच्च न्यायालयात पोहचले होते. यावेळी अचानक तेथे चिलखतधारी सशस्त्र पाकिस्तानी रेंजर्स पोहचले. न्यायालयाची दारे चिलखत वाहनांनी अडवण्यात आली आणि तेथूनच इम्रान खान यांना पकडून बाहेर आणण्यात आले.

- Advertisement -

काय आहे अल कादिर ट्रस्ट?
इम्रान खान यांनी पंतप्रधान असताना अल कादिर ट्रस्ट अंतर्गत विद्यापीठाला कोट्यावधी रुपयांची जमीन बेकायदेशीरपणे दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी पीटीआय पक्षाच्या इतर नेत्यांचाही या ट्रस्टशी संबंध आहे. हे प्रकरण त्यांचे सरकार आणि प्रॉपर्टी टायकून यांच्यातील कथित भागिदारीशी संबंधित आहे. यामुळे पाकिस्ताच्या अर्थव्यवस्थेला तब्बल 50 अब्ज रुपयांचे नुकसान झाले होते. इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा हे दोघेच अल कादिर विद्यापीठाचे विश्वस्त आहेत. सुमारे 90 कोटींच्या या विद्यापीठात 6 वर्षात केवळ 32 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आल्याचे म्हटले जाते. खान यांच्यावर एकूण 108 गुन्हे दाखल आहेत.

 

- Advertisment -