घरदेश-विदेश'मिशन शक्ती'मुळे इम्रान खान यांनी बोलवली उच्चस्तरीय बैठक

‘मिशन शक्ती’मुळे इम्रान खान यांनी बोलवली उच्चस्तरीय बैठक

Subscribe

भारताचे मिशन शक्ती फत्ते झाल्यानंतर पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांनी उच्चस्तरीय बैठक बोलवली होती. तर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यासंबंधीत एक पत्रक सुद्धा प्रसिद्धीस दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दि. २७ रोजी भारताच्या अंतराळ क्षेत्रात एक महत्वाची कामगिरी बजावली आहे, अशी घोषणा केली. भारतीय शास्त्रज्ञांनी अँटिसॅटेलाईट मिसाईलद्वारे एक एलईओ (LEO) लाईव्ह सॅटेलाईट उध्वस्त केले आहे. अमेरिका, चीन आणि ,रशिया यानंतर अशी कामगिरी करणारा भारत हा चौथा देश ठरला आहे. मिशन शक्तीच्या माध्यमानी ए-एसएटी ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र, भारताने केलेल्या या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. पाकिस्तानने जगातील इतर देशांकडे भारताविरोधात आवाज उठवण्याचा आग्रह केला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्या पत्रकात असे म्हटले आहे की, ‘अंतराळाकडे मानवतेला वारदान म्हणून पाकिस्तान बघतो. प्रत्येक देशांनी यापासून लांब राहिले पाहिजे. जेणे करून अंतराळाचे सैन्यीकरण होणार नाही. यापूर्वी ज्या देशांनी या विरोधात आवाज उठवला. ते पुन्हा एकदा यासंदर्भात आवाज उठवतील’, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकात व्यक्त केले आहे.

बोलावली उच्चस्तरीय बैठक

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात भारताच्या नावाचा कुठेही उल्लेख केलेला नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सुरक्षीततेच्या मुद्द्यावर उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल बावजा यांच्यासह अनेक सैन्य अधिकारी या बैठकीत उपस्थित होते. भारताने मिशन शक्ती यशस्वी केल्यानंतर पाकिस्तानाने अशा प्रकारची प्रतिक्रिया आणि बैठक बोलाविण्यात आली होती. दरम्यान, या यशस्वी कामगिरीनी भारताने अवकाश संशोधन क्षेत्राच्या इतिहासात स्वतःचे नाव कोरले आहे. अशा प्रकारे मिसाइलच्या सहाय्याने उपग्रह पाडणाऱ्या यादीत चौथ्या स्थानावर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -