घरदेश-विदेशइम्रान खान निवडणूक लढवू शकतात, इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण

इम्रान खान निवडणूक लढवू शकतात, इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण

Subscribe

कराची – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना इस्लामाबाद न्यायालयाने दिलासा दिला आहे. इम्रान खान यांना भविष्यात निवडणूक लढवण्यास मनाई नसल्याचे इस्लामाबाद उच्च न्यायालयाने सांगितले आहे. निवडणूक आयोगाने त्यांना निवडणुकीसाठी अपात्र ठरवले होते.

तोशखाना प्रकरणात निवडणूक आयोगाने पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर कारवाई केली होती. त्यांना पुढील पाच वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास मनाई करण्यात आली होती. या प्रकरणी इम्रान खान यांनी इस्लमाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानुसार, मुख्य न्यायधीश अथर मिनाल्लाह म्हणाले की, खान यांना भविष्यात निवडणूक लढवण्यास प्रतिबंध करण्यात आलेला नाही आणि ते खैबर-पख्तुनख्वा प्रांतातील कुर्रम जिल्ह्यात 30 ऑक्टोबर रोजी होणारी निवडणूक लढविण्यास पात्र आहेत.

- Advertisement -

हेही वाचा तोशखाना प्रकरणी इमरान खान यांना पाच वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी; कायदेशीर कारवाई होणार?

IHC च्या प्रशासकीय निबंधकाने आक्षेप घेतल्यानंतरही खान यांचे वकील अली जफर यांनी सुनावणी सुरू करण्यासाठी दबाव आणला तेव्हा IHC चे सरन्यायाधीश म्हणाले, “इम्रान खान यांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आलेले नाही. या प्रकरणात घाई करण्याची गरज नाही.”

- Advertisement -

1974 साली स्थापन झालेला तोषखाना विभाग उच्च पदावरील लोकांकडून मिळालेल्या मौल्यवान भेटवस्तू गोळा करतो आणि कॅबिनेट विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली या संस्थेचं काम चालतं. या तोषखानातील वस्तू विक्रीनंतरही  मिळालेली रक्कम इम्रान खान यांनी लपवली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांच्यावर सुनावणी सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -