घरदेश-विदेशImran Khan : इम्रान खान यांना दहा वर्षांचा तुरुंगवास; सीफर प्रकरणात सुनावली...

Imran Khan : इम्रान खान यांना दहा वर्षांचा तुरुंगवास; सीफर प्रकरणात सुनावली शिक्षा

Subscribe

इम्रान खान सध्या रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात बंद असून त्याच न्यायालयात आज या प्रकरणाचा निकाल सुनावण्यात आला. विशेष न्यायालयाचा हा निर्णय इम्रानसाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण, त्यांना पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणूक लढवायची होती.

नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू तथा माजी पंतप्रधान इम्रान खान यांना आज मंगळवारी (30 जानेवारी) मोठा धक्का बसला आहे. सीफर प्रकरणात न्यायालयाने पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. इम्रानसोबत त्याचे सहकारी आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनाही 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. (Imran Khan Imran Khan jailed for ten years Sentencing in the cipher case)

इम्रान खान सध्या रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात बंद असून त्याच न्यायालयात आज या प्रकरणाचा निकाल सुनावण्यात आला. विशेष न्यायालयाचा हा निर्णय इम्रानसाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण, त्यांना पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणूक लढवायची होती. दोन्ही नेत्यांना प्रत्येकी 10 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर निवडणूक लढविण्याचा मार्ग बंद झाल्याचे मानले जात आहे. तेव्हा आता इंम्रान खान यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येते की, काय? अशीही चर्चा सध्या रंगत आहे.

- Advertisement -

काय होते नेमकं प्रकरण?

मार्च 2022 मध्ये इम्रान खान यांच्यावर पाकिस्तान दूतावासाद्वारे अमेरिकेत पाठवलेली गुप्त डिप्लोमॅटिक केबल (सीफर) लीक केल्याचा आरोप होता. याच प्रकरणात त्यांच्यावर अधिकृत गुप्तता कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असून त्याला मागील वर्षी 2023 च्या ऑगस्टमध्ये अटक करण्यात आली होती. परकीय षड्यंत्रामुळे आपले सरकार पाडले गेले असे सुचवण्यासाठी इम्रान खान यांनी या दस्तऐवजाचा वापर केला होता असाही आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता. याप्रकरणात झालेल्या विशेष सुनावणीत त्यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले होते.

हेही वाचा : Bihar Politics : मुख्यमंत्री नितीश कुमारांना ‘शह’ देण्यासाठी इंडिया आघाडीची रणनीती; असा आहे प्लॅन

- Advertisement -

इम्रान खान यांनी फेटाळले होते आरोप

रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अबुल हसनत जुलकरनैन यांनी या प्रकरणाची सुनावणी केली होती. मात्र, इम्रान आणि कुरेशी यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळून लावत आपल्याला या प्रकरणात गोवल्या गेल्याचा आरोप केला त्यांनी केला होता.

हेही वाचा : Ravindra Dhangekar : आमदार रवींद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल; महापलिका अधिकाऱ्याला शिवीगाळ करणं भोवलं

ऑगस्टमध्ये केले होते इम्रान खान यांना अटक

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 2023 वर्षातील ऑगस्टमध्ये अटक करण्यात आली होती. इम्रान खान यांच्यावर वॉशिंग्टनमधील पाकिस्तान दूतावासाने पाठवलेली गुप्त डिप्लोमॅटिक केबल (सीफर) लीक केल्याचा आरोप लावण्यात आला होता. देशाच्या गोपनीयतेच्या कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -