घरताज्या घडामोडीImran Khan : अविश्वास प्रस्तावावरील मतदानापूर्वीच घाबरले इम्रान खान, खासदारांना व्हिप जारी

Imran Khan : अविश्वास प्रस्तावावरील मतदानापूर्वीच घाबरले इम्रान खान, खासदारांना व्हिप जारी

Subscribe

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्याविरोधात पाकिस्तान नॅशनल असेंबलीमध्ये विरोधी पक्ष अविश्वास प्रस्ताव आणणार आहे. या प्रस्तावाच्या मतदानापूर्वीच इमरान खान घाबरले आहेत. असेंबलीत मतदान होणाऱ्या दिवशी पार्टीतील खासदारांना उपस्थित न राहण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी इमरान खान यांनी व्हिप जारी करत पत्राद्वारे खासदारांना निर्देश दिले आहेत.

पाकिस्तान पंतप्रधान इमरान खान यांनी खासदारांना पत्रात म्हटले आहे की, पाकिस्तानचे पंतप्रधान यांच्याविरोधात नॅशनल असेंबलीमध्ये अविश्वास प्रस्तावावर होणाऱ्या मतदानापासून दूर राहण्याचे निर्देश पाकिस्तान तहरीके-इंसाफच्या सदस्यांना देण्यात आले आहेत. तसेच या दिवशी काय करावे आणि करु नये यासंबंधित महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. दिलेल्या आदेशांचे पालन करण्यात यावे असे आदेश देण्यात आले आहेत.

- Advertisement -

पाकिस्तान नॅशनल असेंबलीमध्ये पाकिस्तान तहरीक-ए- इंसाफ पक्षाचे सर्व खासदार मतदानापासून दूर राहतील. ३१ मार्चला अविश्वास प्रस्ताव आणला जाणार आहे. या दिवशी नॅशनल असेंबलीतील बैठकीला खासदार उपस्थित नसतील. अविश्वास प्रस्तावावर सभागृहात चर्चेदरम्यान सर्वाधिक वेळ सत्ताधारी पक्षातील नेत्यांना बोलण्याची संधी दिली जाणार आहे.

इमरान खान यांच्याविरोधात विरोधी पक्षनेते शहबाज शरीफ यांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे. शरीफ हे तीन वेळा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे बंधू आहेत. आपले सरकार कोसळण्यापासून रोखायचे असेल तर इमरान खान यांना ३४२ पैकी १७२ सदस्यांचे समर्थन पाहिजे परंतु सरकारमधील मित्रपक्ष विरोधकांसोबत गेल्यामुळे इमरान खान यांची सरकार अल्पमतात आहे. सभागृहात अविश्वास प्रस्ताव पारित करण्यात आला आहे. आता या प्रस्तातावर गुरुवारी चर्चा करण्यात येणार आहे. या प्रस्तावावर गुरुवारी चर्चा सुरु करण्यात येणार आहे. तसेच ७ दिवसांमध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ऐकावं ते नवलच! मुस्लिम भाडेकरूनं घरात लावला मोदींचा फोटो अन् घरमालकाला आला राग, मग…

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -