घरदेश-विदेशइम्रान खान समर्थकांचा पंतप्रधानांच्या घरावर हल्ला; पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये रात्रभर धुमश्चक्री

इम्रान खान समर्थकांचा पंतप्रधानांच्या घरावर हल्ला; पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये रात्रभर धुमश्चक्री

Subscribe

नवी दिल्ली : पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या अटकेनंतर पाकिस्तानातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. इम्रान खान यांच्या समर्थकांनी बुधवारी (10 मे) रात्री हिंसाचार, जाळपोळ, चकमकी आणि दंगली घडवताना कारचे शोरूम, मेट्रो स्टेशन आणि चेकपॉईंट जाळले आहेत. त्यांनी लष्कराच्या मुख्यालयापासून कॉर्प्स कमांडरच्या घर आणि बँकाही लुटल्या आहेत. ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ (shehbaz sharif) यांच्या खाजगी निवासस्थानाला आग लावल्याची माहिती मिळत आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अनेक प्रयत्नांनंतर अखेर मंगळवारी अटक करण्यात आली. पाकिस्तानी रेंजर्सनी त्याला ताब्यात घेतले. इम्रान खान यांना अल-कादिर ट्रस्टच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे, या संदर्भात 1 मे रोजी त्याच्याविरुद्ध वॉरंट जारी करण्यात आले होते. इम्रान खान यांना अटक झाल्यानंतर पाकिस्तान तेहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. या आंदोलकांना पीटीआय कार्यकर्त्यांपेक्षा इम्रान समर्थक म्हणणे योग्य ठरेल. कारण पाकिस्तानमध्ये कालची रात्र हिंसाचार आणि अशांततेने गाजली.

- Advertisement -

पीटीआय आंदोलकांनी काल रात्री हिंसाचार, जाळपोळ, चकमकी आणि दंगली घडवताना कारचे शोरूम, मेट्रो स्टेशन आणि चेकपॉईंट जाळले आहेत. त्यांनी लष्कराच्या मुख्यालयापासून कॉर्प्स कमांडरच्या घर आणि बँकाही लुटल्या आहेत.  जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला आणि गोळीबारही केला. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला असून मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. इम्रान खान यांच्या अटकेनंतर तीव्र प्रतिक्रिया उमटत असल्यामुळे सध्या पाकिस्तानमध्ये कलम 144 लागू करण्यात आली असून इंटरनेट सेवा बंद असून फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबची सेवाही बंद करण्यात आली आहे.

शाहबाज शरीफ यांचे घर जाळले
इम्रान खान यांच्या समर्थकांनी बुधवारी रात्री पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या खाजगी निवासस्थानाला आग लावल्याची माहिती मिळत आहे. गेल्या वर्षी अविश्वास ठरावाद्वारे इम्रान यांची सत्तेतून हकालपट्टी करून शेहबाज शरीफ  पंतप्रधान झाले आहेत.

- Advertisement -

पोलीस आणि पीटीआय कार्यकर्त्यांमध्ये रात्रभर चकमक
ट्विटरवरील एक एका व्हिडिओमध्ये इम्रान खान समर्थक रात्री मशाल घेऊन एका ठिकाणी जमताना दिसत आहेत. पोलीस आणि पीटीआय कार्यकर्त्यांमध्ये रात्रभर चकमक सुरू होती. यात एकाचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहेत. गेल्या वर्षी सत्ता गमावल्यापासून इम्रान खान सातत्याने पाकिस्तानी लष्करावर हल्ले करत आहेत. त्यामुळेच त्यांच्या अटकेनंतर पीटीआय लष्कराविरुद्ध सुरू केलेल्या आंदोलनाचे आता युद्धात रूपांतर झाल्याचे पाहायला मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -