Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Imran Khan : पंतप्रधानपदावरून हटवण्यासाठी अमेरिकेकडून अल्टिमेटम; पाकिस्तानच्या कागदपत्रातून खुलासा

Imran Khan : पंतप्रधानपदावरून हटवण्यासाठी अमेरिकेकडून अल्टिमेटम; पाकिस्तानच्या कागदपत्रातून खुलासा

Subscribe

Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना तोशाखाना प्रकरणात (Toshakhana case) दोषी ठरल्यानंतर तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान, एप्रिल 2022 मध्ये अविश्वास प्रस्तावाद्वारे सत्ता गमावल्यानंतर इम्रान खान यांनी नेहमीच अमेरिकेला दोष दिले होते. इंटरसेप्ट या अमेरिकन वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, अमेरिकेच्या दबावाखाली इम्रान यांना सत्तेवरून हटवण्यात आले आहे. त्यांनी काही केबल्सचा हवाला दिला आहे. (Imran Khan Ultimatum from US to remove PM Excerpts from Pakistan documents)

इंटरसेप्ट या मीडिया संस्थेच्या अहवालानुसार, पाकिस्तान सरकारच्या गुप्त कागदपत्रानुसार, यूएस स्टेट डिपार्टमेंटने 7 मार्च 2022 रोजी झालेल्या बैठकीत पाकिस्तान सरकारला इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून हटवण्यास सांगितले होते. कारण युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणाबाबत इम्रान खान यांनी घेतलेल्या तटस्थ भूमिकेवर अमेरिका खूश नव्हती. लीक झालेल्या पाकिस्तानी सरकारी कागदपत्रातून अमेरिकच्या अधिकार्‍यांशी झालेल्या बैठकीनंतर अवघ्या एका महिन्यानंतर पाकिस्तानी संसदेत इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला होता. संसदेत पार पडलेल्या मतदानानंतर इम्रान खान यांचे सरकार पडले आणि त्यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले होते.

- Advertisement -

हेही वाचा – Nirmala Sitharaman : “तुम्ही स्वप्नं दाखवत राहिलात, परंतु आम्ही…”; अर्थमंत्र्यांनी विरोधकांवर केला हल्लाबोल

अमेरिकेच्या विनंतीवरून इम्रान खान यांना सत्तेतून काढून टाकले

इंटरसेप्ट मीडिया संस्थेच्या अहवालानुसार, पाकिस्तानमधील सर्वात शक्तिशाली लष्कराच्या मदतीने संसदेत मतदान आयोजित करण्यात आल्याचे मानले जात आहे. इम्रान खान यांचे सरकार पडल्यानंतर त्यांचे आणि त्यांच्या समर्थकांचे लष्कर व मित्रपक्षांशी भांडण सुरू आहे. त्यामुळेच इम्रान खान यांना अमेरिकेच्या विनंतीवरून सत्तेतून काढून टाकल्याचा दावा करण्यात आला आहे. अमेरिकेत ‘सायफर’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या केबलने अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याकडून इम्रान खान यांच्याविरोधात कसे षडयंत्र रचले हे उघड केले आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने पाकिस्तानला दिले होते आश्वासन 

- Advertisement -

इम्रान खान यांना हटवल्यास अमेरिकेसोबतचे संबंध सुधारतील, असे आश्वासन परराष्ट्र खात्याने दिले होते. याशिवाय इम्रान खान यांचे सरकार पाडले नाही तर, संबंध पूर्णपणे संपुष्टात येऊ शकतात, अशी भीतीही परराष्ट्र खात्याने दिली होती, अशा दावा इंटरसेप्टने केला आहे. इंटरसेप्टला जुनी कागदपत्रे पाकिस्तानी लष्करातील एका अज्ञात व्यक्तीकडून मिळाली आहेत. त्याचा इम्रान खान किंवा त्यांच्या पक्षाशी कोणताही संबंध नसल्याचेही त्या अज्ञात व्यक्तीने म्हटले आहे.

हेही वाचा – निवडणूक आयोगाच्या नेमणुकांमध्ये बदल, अशी असेल आयुक्त ठरवणाऱ्या समितीची रचना

इम्रान खान यांची राजकीय कारकीर्द संपली?

इम्रान खान यांच्या समर्थकांकडून आणि नागरी विरोधकांकडून पाकिस्तानमध्ये सतत गोंधळ सुरू असतो. 5 ऑगस्ट रोजी जेव्हा इम्रान खान यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली, तेव्हा पाकिस्तानमध्ये राजकीय संघर्ष वाढला होता. तसेच त्यांची सत्तेतून हकालपट्टी केल्यानंतर इम्रान खान यांना दुसऱ्यांदा ताब्यात घेण्यात आले होते. परंतु इम्रान खान यांच्या समर्थकांनी त्यांच्यावरील आरोपांना नेहमीच निराधार म्हटले आहे. असे असले तरी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या शिक्षेमुळे निवडणूक आयोगाने त्यांना पाच वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास बंदी घातली आहे.

- Advertisment -