Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश इम्रान खान यांच्या अडचणी वाढल्या; पाकिस्तानी लष्कराने दिले दोन पर्याय

इम्रान खान यांच्या अडचणी वाढल्या; पाकिस्तानी लष्कराने दिले दोन पर्याय

Subscribe

नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे (PTI) प्रमुख इम्रान खान यांच्या अडचणीत गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली आहे. त्यात आता पाकिस्तानी लष्कराने त्यांना दोन पर्याय दिले आहेत. त्यामुळे इम्रान खान कोणता पर्याय निवडतात हे पाहावे लागेल. (Pakistan Army gave two options to Imran Khan)

इम्रान खान यांना 9 मे रोजी इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या परिसरातून नाट्यमयिरत्या अटक करण्यात आली होती. त्यानंतर पीटीआय समर्थकांनी पाकिस्तानमध्ये हिंसाचारासारख्या घटना घडवून आणल्या. असे असले तरी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने 12 मे रोजी अल कादिर ट्रस्ट प्रकरणी इम्रान खान यांना दोन आठवड्यांचा जामीन मंजूर करताना अधिकाऱ्यांना 15 मे पर्यंत देशात कोठेही नोंदवलेल्या कोणत्याही प्रकरणात इम्रान खान यांना अटक करण्यापासून दिलासा दिला असला तरी लष्कर आणि सरकार त्यांना सोडण्याच्या मनस्थितीत नाही. सध्या परिस्थिती अशी आहे की, इम्रान खान यांना पुन्हा एकदा अटक करण्यासाठी लष्कराची तुकडी त्यांच्या घराबाहेर जमा झाली आहे.

- Advertisement -

इम्रान खान यांच्या घराला पोलिसांनी घेराव घातल्याची माहिती मिळताच इम्रान यांचे समर्थकही त्याच्या घराबाहेर मोठ्या संख्येने जमा होऊ लागले आहेत. परंतु 9 मे रोजी इम्रानच्या अटकेनंतर ज्यांनी लष्कराच्या तळांवर हल्ला केला, त्या लोकांना लष्कर आणि सरकार दहशतवादी म्हटले जात आहे. काल पंजाब सरकारने इम्रान खान यांना २४ तासांचा अल्टिमेटम दिला होता आणि ती वेळही आता निघून गेली आहे. सध्या इम्रानवर आरोप आहे की, त्याच्या घरात 30 ते 40 दहशतवादी लपले आहेत.

पाकिस्तानी पत्रकारांच्या म्हणण्यानुसार, इम्रान खान चुकीची विधाने केल्यामुळे अडचणीत सापडले आहेत. त्याचवेळी ऑल इंडिया अँटी टेररिस्ट फ्रंट (AIAF) चे अध्यक्ष एमएस बिट्टा म्हणतात की, इम्रान खानची अवस्था बेनझीर भुट्टोसारखीच होणार आहे.

- Advertisement -

पाकिस्तानी लष्कराने दिले दोन पर्याय
पाकिस्तानमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर लष्कर प्रचंड संतापले आहे. त्यामुळे इम्रान खान यांना पाकिस्तानी लष्कराने दोन पर्याय दिले आहेत. एकतर दुबई, लंडनला जा किंवा आर्मी ऍक्ट अंतर्गत खटल्याला सामोरे जा, अशी माहिती सूत्रांनी  दिली आहे. पण सध्याच्या परिस्थितीत इम्रान खान परदेशात जाण्यास तयार नाही. त्यामुळे त्यांना आर्मी ऍक्टच्या खटल्याला सामोरे जावे लागू शकते. आर्मी ऍक्ट अंतर्गत 99 टक्के प्रकरणांमध्ये शिक्षा झाली आहे. त्यामुळे इम्रान खान यांच्याकडे कोणता पर्याय उरला आहे? इम्रान लष्कराला शरण जाणार की सर्वोच्च न्यायालय पुन्हा एकदा बचावाचा प्रयत्न करतील? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

पाकिस्तानात याआधीही असेच प्रकार घडले
खटला टाळण्यासाठी पाकिस्तानातील माजी पंतप्रधान परदेशात जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. पाकिस्तानचे दिवंगत राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या काळात सत्तापालट झाल्यानंतर 1997 मध्ये माजी पंतप्रधान नवाझ शरीफ सौदी अरेबियात गेले होते. आता नवाझ शरीफ यांच्या भावाच्या राजवटीत माजी पंतप्रधान इम्रान खान यांना खटला टाळण्यासाठी पाकिस्तान सोडण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

- Advertisment -